Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

इंटरनेट सुरक्षितता चर्चासत्र


इंटरनेट सुरक्षितता चर्चासत्र
सॅन फ्रान्सिस्को डिजिटल कनेक्टर्स इंटरनेट सुरक्षिततेविषयी चर्चा करतात
बीहाइव्ह डिजिटल कनेक्टर्स सादर करतात
इंटरनेट सुरक्षितता
हाय, माझे नाव आहे जेफरसन
माझे नाव आहे टायरी
हॅलो, माझे नाव आहे ब्रायना
हाय, माझे नाव आहे कॅरोलिन
हाय, माझे नाव आहे लुब्रांडा
माझे नाव आहे साकिरी
“डिजिटल कनेक्टर्स हा समाजातील सदस्यांना संगणक व इंटरनेट वापरण्यासाठी प्रशिक्षित करून डिजिटल संस्कृती पसरवण्यास मदत करणारा एक तरुणांचा गट आहे.” “आज सॅन फ्रान्सिस्को डिजिटल कनेक्टर्स इंटरनेट सुरक्षिततेविषयी स्थानिक रहिवाशांशी, पालकांशी आणि एकमेकांशी चर्चा करत आहेत.”
[संगीत]
इंटरनेट सुरक्षितता:
मायस्पेस व सोशल नेटवर्किंग
वक्ता 1 (जेफरसन): जर आपली प्रोफाइल असेल तर आपण आपला पासवर्ड गुंतागुंतीचा, पण आपल्याला लक्षात राहण्यासाठी सोपा ठेवावा, त्यामुळे तो कोणीही हॅक करून आपली व्यक्तिगत माहिती मिळवू शकणार नाही.
वक्ता 2 (कॅरोलिन): ठीक आहे, आपले मायस्पेस वर अकाउंट असेल तर आपली माहिती मिळवण्याचा प्रयत्न करणार्‍या लोकांपासून आपले संरक्षण करण्यासाठी आपण आपली प्रोफाइल खासगी बनवू शकता, त्यामुळे आपली वेबसाइट, आपले पान कोणी पाहावे व पाहू नये हे आपण ठरवू शकता
सूचना: आपली मायस्पेस प्रोफाइल “प्रायव्हेट” वर बनवा, त्यामुळे फक्त आपले मित्र आपल्याला पाहू शकतील. लक्षात ठेवा, आधी सुरक्षितता!
वक्ता 3 (ब्रायना): जर मी आपल्याला ओळखत नसेन, जर मला आपला फक्त फोटो माहिती असेल, तर मी पुढे जाणार नाही, इतके सोपे आहे हे.
वक्ता 4: मला वाटतं जर आपल्याकडे साधी समज असेल तर आपली कोणतीही व्यक्तिगत माहिती इंटरनेटवर टाकायची नसते हे आपल्याला हे माहिती असेल, कारण हा सरळ मूर्खपणा आहे...
पण जर आपण आपले फोटो वगैरे किंवा काहीतरी अशी आपली व्यक्तिगत माहिती टाकणार असाल तर आपण आपले फोटो धूसर करावे, त्यामुळे लोक ती आपल्याविरुद्ध वापरू शकणार नाहीत...
सूचना: आपली व्यक्तिगत माहिती इंटरनेट वर न टाकण्याचे लक्षात ठेवा
हुशार व्हा! आपली व्यक्तिगत माहिती इंटरनेटभर टाकू नका
वक्ता 2 (कॅरोलिन): एक मुलगी तिच्या पूर्वीच्या प्रियकराशी असलेल्या माझ्या नात्यामुळे माझ्यावर मायस्पेसमधून हल्ला करण्याचा प्रयत्न करत होती, आणि शेवटी तिने शेवटी तिची संपूर्ण प्रोफाइल बदलली, तिने स्पष्ट माझे नाव नाही टाकले, पण ते मला उद्देशून होते हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे हो, हा माझा व्यक्तिगत अनुभव होता. आपल्याला पाहायचे असेल तर ते अजूनही तिथेच आहे.
आपली घाण रस्त्यावर आणू नका!
आपल्या व्यक्तिगत गोष्टी खासगीत राहू द्या
वक्ता 4: मला असं वाटतं की जर ती व्यक्ती आपल्याला माहिती असेल आणि तरी आपल्याला भीती वाटत असेल तर आपल्याला तिच्याशी व्यक्तिगत, समोरासमोर भेट घ्यावी लागेल
आपली गुपिते जगाला माहिती व्हावीत असे आपल्याला वाटत नसणार...
मग त्यांना मायस्पेस वर का ठेवायचे
वक्ता 5: आपल्याला फिशिंग विषयी बरीच माहिती आहे, तिथे लोक आपल्याला ईमेल पाठवतात, समजा बॅंक ऑफ अमेरिका, मला इतक्यातच बॅंक ऑफ अमेरिका कडून माझ्या माहितीची त्यांना गरज असल्याचे सांगणारे ईमेल आले, पण ते मला तितकेसे बरोबर वाटले नाही, माझ्याकडे अजूनही त्यांचे क्रेडिट कार्ड होते, तरीही हे मला बरोबर वाटत नव्हते, म्हणून मी थांबलो आणि बॅंक ऑफ अमेरिकाला कॉल करून म्हणालो: तुम्ही लोकांनी मला हे सगळे पाठवले का, आणि ते म्हणाले: “नाही, आम्ही नाही पाठवले”, आणि ती खरे तर फिशिंगसाठी केलेली फसवेगिरी होती कारण त्यांना तुमची माहिती हवी असते.
फिशिंग
संवेदनशील माहिती लबाडीने मिळवण्याचा प्रयत्न
इंटरनेटवर व्यक्तिगत माहिती देताना सावधगिरी बाळगा
सूचना: जेव्हा शंका असेल तेव्हा आपल्या अंतःप्रेरणेवर विश्वास ठेवा.
सूचना: महत्वाच्या माहितीच्या खात्रीसाठी कॉल करा.
वक्ता 6: आपली मुले जर कुठे साइन अप होत असतील तर पालकांनी त्यांना माहिती द्यायला हवी, इंटरनेटवर काय टाकावे, काय टाकू नये, जसे सामाजिक सुरक्षा क्रमांक, कारण प्रत्येक वेळी काही आपल्याला सामाजिक सुरक्षा टाकावे लागत नाही, आणि बस, असेच आहे हे.
पालक: सामिल व्हा!
वक्ता 3: आपल्या सर्वांना असे वाटते का की पालकांनी आपली मुले संगणकावर बसलेली असताना त्यांच्यावर लक्ष द्यावे, किंवा काही पालक आपल्या मुलांवर विश्वास ठेवतात की त्यांची मुले कोणत्याही साइटवर जात नाहीत, किंवा पालकांना काहीच देणे घेणे नाही असे वाटते.
वक्ता 2: मला वाटते, पालकाचे आपल्या मुलाशी/मुलीशी इंटरनेट वगैरे वर चांगले नाते असावे म्हणून त्यांच्याशी एकूणच चांगले नाते असले पाहिजे, कारण आपोआपच ते विचार करतात की ओ हो, इंटरनेटबद्दल आहे का हे, आणि मग ते सरळ दुर्लक्ष... मला काय म्हणायचे आहे हे तुलच्या लक्षात आले असेल.
वक्ता 7: माझ्याकडे पालकांसाठी एक सूचना आहे, की त्यांनी सर्व मुलांसाठीचा संगणक त्यांच्या खोलीऐवजी जेवणाच्या खोलीत ठेवावा, कारण ते नेहमी दारे बंद करतात त्यामुळे ते आत काय करत आहेत ते आपल्याला दिसत नाही, पण जर आपण हॉलमध्ये आणि जेवणाच्या खोलीत गेलात तर आपण त्यांच्यावर कायम लक्ष ठेवू शकता.
पालकांनो! आपला संगणक हॉलमध्ये ठेवा म्हणजे आपण आपल्या मुलांवर लक्ष ठेऊ शकाल.
वक्ता 5: लाइम वायर ही गोष्ट आहे जी आपल्याला पहावीशी वाटते कारण जेव्हा आपण चित्रपट, किंवा गाणी, संगीत डाउनलोड करून घेता तेव्हा त्या डाउनलोडमध्ये इतर कचरा येतो, डाउनलोडिंग किंवा काहीही, त्यामुळे त्या गोष्तीवर मला लक्ष ठेवायचे आहे आणि मी त्यांना नेहमी दर आठवड्यात किंवा दररोज संगणक बंद करण्यापूर्वी ऍड-वेअर चेक-अप करण्याविषयी सांगत असतो त्यामुळे त्याची खरच मदत होते.
लक्षात ठेवा:
बेकायदेशीर सॉफ्टवेअर डाउनलोड करणे... बेकायदेशीर आहे! तसे करणे म्हणजे व्हायरसला खुले आमंत्रण आहे.
सूचना: आपला संगणक उत्तम स्थितीत राहण्यासाठी नेहमीचे वाईट सॉफ्टवेअरचे चेक्स चालवा!
पालकांनो लक्षात ठेवा:
आपली मुले इंटरनेटवर काय करत आहेत ते तपासा. त्यांची सुरक्षितता आपल्या हातात आहे.
वक्ता 8: पालकांनी इंटरनेट सुरक्षितता किंवा सर्वसाधारण इंटरनेटविषयी लक्ष घालण्यासाठी मला वाटते त्यांचा आपल्या मुलांशी चांगला संवाद असावा आणि जे चालले आहे त्याच्या ते संपर्कात असावे, आपण सर्वांनी काही ना काही केलेले आहे आणि माहिती करून घ्या आणि त्यांच्याशी बोला.
सूचना: आपल्या मुलांशी संवाद साधा, त्यांची सुरक्षितता आपल्या हातात आहे.
वक्ता 2: मुलाच्या/मुलीच्या सुरक्षिततेची खात्री करून घेण्यासाठी अशा प्रकारच्या गोष्टींवर आपण लक्ष ठेवले पाहिजे.
वक्ता 4: मला बीहाइव्ह ईझी वर पहायला या, इंटरनेट सुरक्षिततेविषयी माहिती करून घ्या. एक दोन तीन
ठीक आहे.
अधिक माहितीसाठी www.beehive.org/safety येथे भेट द्या
निर्माते:
बीएव्हीसी यूथ प्रॉडक्शन्स
बे एरिया व्हिडिओ कोऍलिशन
2727 मारीपोसा स्ट्रीट, 2रा मजला
सॅन फ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया 94110
youthproductions@bavc.org
415.558.2150

0
No votes yet
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation