Skip to Main Content

Current Domain

MumbaiChange

गृहनिर्माण संस्थांचे लेखापरीक्षण

लेखापरीक्षण
सौजन्य -supermatters.com.au

सहकारी गृहनिर्माण संस्थांचे लेखापरीक्षण (ऑडीट) म्हणजे संस्थेतील सत्यता आणि परिणाम यांची तपासणी करून पडताळणी करणे. विधीनियमांची उद्दिष्टे व आर्थिक व्यवहारांचे ताळेबंद पत्रक, मूळ कागदपत्रे, आदी बाबींची तपासणी करून अहवाल (रिपोर्ट) तयार केला जातो.  

गृहनिर्माण संस्थेने योग्य पद्धतीने केलेला खर्च, सभासदांविषयी संस्थेचे दायित्व, शिक्षण निधी भरणा, चुका व गैरव्यवहार घडू नयेत, इ. बाबी लेखापरीक्षणात पहिल्या जातात. संस्थेचा कारभार योग्य रीतीने सुरु असल्याची खातरजमा करणे, लेखापरीक्षकाची जबाबदारी आहे. 

संस्था सुरु असताना दैनंदिन जमा-खर्च, बँकेचे व्यवहार, सभासदांच्या सेवा-सुविधा, सदस्यांच्या समस्यांचे निवारण, गृहनिर्माण संस्थांमधील महत्वपूर्ण निर्णय, इ. बाबी पडताळून कराव्या लागतात. गृहनिर्माण संस्थेच्या लेखापरीक्षण अहवालामध्ये संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभा, नफा-तोटा पत्रक, ताळेबंद, आदींचा समावेश असतो. 

या लेखामध्ये आम्ही तुम्हाला लेखापरीक्षण प्रक्रिया, आवश्यकता,  लेखापरीक्षणाचे फायदे, संबधित कागदपत्रे,आदी गोष्टींची माहिती सांगणार आहोत. त्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा.    

 

- मनिषा राऊत 
शासकीय प्रमाणित लेखापरीक्षक
संपर्क – ९२६०५३१३९७/९३२५५४०६९१ 
इ मेल – manisharaaut@gmail.com      

 

 

 

 

2
Average: 2 (1 vote)
Your rating: कुछ नहीं

Thanks for the excellent post. Please continue the good work. Thanks a lot again.
Regards,
Veer Shivaji.
latest govt jobs

»
© Copyright 2001 - 2017 One Global Economy Corporation