Skip to Main Content

Current Beehive

MumbaiChange

आरोग्य विम्याचे महत्व

आरोग्य विम्याचे महत्व
सौजन्य -blog.research.chop.edu

दैनंदिन आयुष्यात सर्वजण एवढे व्यस्त असतो, की आपल्याला स्वत:कडे आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्याकडे वेळ द्यायला लक्ष नसते. घडाळ्याच्या काट्याप्रमाणे चालणारे आपले आयुष्य चाकोरीबद्ध होण्याकडे वळते. कुटुंब, कार्यालय, मनोरंजन, कार्यक्रम आणि आरोग्य यांच्या वेळेचे नियोजन करताना तारेवरची कसरत करावी लागते. एकत्र कुटुंब पद्धतीकडून स्वतंत्र कुटुंब व्यवस्था, जागेचे स्थलांतर, नोकरी-व्यवसाय,मुलांचे संगोपन, आदी गोष्टींमुळे स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्याकडे दुर्लक्ष होते.  

घरातील एखाद्या व्यक्तीचे आरोग्य बिघडले की, कुटुंबाची व्यवस्था ही चिंताजनक परिस्थितीत सापडते. अशा परिस्थितीत तुमचा ‘आरोग्य विमा’ असल्यास आर्थिक आधार मिळतो. जर आरोग्यविमा नसल्यास तर सामाजिक व स्वयंसेवी संस्था(ट्रस्ट), सरकारी रुग्णालयांवर अवलंबून रहावे लागते. शासकीय रुग्णालयांतील आरोग्य सुविधा, उपचार व आधुनिक यंत्रणा यांच्यावरील  ताण, गर्दी आणि प्रक्रिया यामध्ये खूप वेळ खर्च होतो. रुग्णाला वेळेवर योग्य उपचार मिळणे, यावर प्राधान्यक्रम असणे आवश्यक आहे.   

आरोग्य विमा असल्यास रुग्णाला चांगल्या रुग्णालयात वेळेवर आणि योग्य उपचार मिळण्यास मदत होते. कुटुंबावर पडणारा आर्थिक ताण कमी होतो. कुटुंबाची आणि रुग्णाची शारीरिक आणि मानसिक ताणातून सुटका होण्यास मदत होते. 

प्रत्येकाने स्वत:चे प्राधान्यक्रम ठरवणे महत्वाचे आहे. आरोग्याला प्रथम प्राधान्य दिले, तर चांगले आरोग्य तुमचा भविष्यकाळ सुरळीत पार पाडण्यास मदत  करतो.   

या लेखामध्ये आम्ही तुम्हाला आरोग्य विम्याची गरज, आरोग्य विम्याचे प्रकार, विमा प्रतिनिधीची निवड, इत्यादी संदर्भातील माहिती देणार आहोत. त्यासाठी डाव्या बाजूवरील लिंक्सवर क्लिक करा.  

 

- सचिन नलावडे 
   विमा मार्गदर्शक
   संपर्क – ९८६७७०८०२४ 
   इ-मेल – snalawade11@gmail.com

 

 

 

 

 

 

 

 

0
No votes yet
Your rating: None