Skip to Main Content

Current Beehive

MumbaiChange

‘आधार’ विशेष मुलांचा...

‘आधार’ विशेष मुलांचा...

भारतातील सर्वात पहिली विशेष मुलांची संस्था म्हणजे आधार ! “विशेष  मुलांना सांभाळणारी अशी एक संस्था हवी, जी त्यांची तहयात काळजी घेईल.” या उद्देशाने कै.श्री.माधवराव गोरे यांनी १९९४ला विशेष मुलांच्या पालकांना एकत्र करून ‘आधार’ संस्थेची स्थापना केली. त्यावेळी देशात मतिमंदांचा आजीवन सांभाळ करून त्यांची काळजी घेणारी कोणतीही संस्था नव्हती. मतिमंद मुलांच्या पालकांचा आधारच्या उभारणीत महत्वाचा वाटा होता. कारण विशेष मुलांच्या समस्यांची जाणीव आणि कल्पना त्यांना चांगल्याप्रकारे माहित होती. आधारमधील शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अपंग मुलांच्या चेहऱ्यावरील समाधान बरेच काही सांगून जाते.  

विशेष मुलांच्या शाळेत वयाच्या १८ वर्षापर्यंत बिहेव्हरीयल अॅडप्टेब्लिटीसारख्या गोष्टी शिकवल्या जातात. ‘बुद्ध्यांक (इंटेलिजन्ट कोशन्ट/आय.क्यू.) कमी असल्यामुळे विशेष मुलांमध्ये शिकण्याची क्षमता  अत्यल्प प्रमाणात असते. वयाच्या १८ वर्षानंतर मतिमंद मुलांमध्ये शारीरिक आणि मानसिक बदल होतात. पालकांना मतिमंद मुलांना सांभाळणे, मुलांसोबतचा संवाद,त्यांच्या समस्या, इ. बाबत जाणून घेणे कठीण असते. त्यामुळे मुलगा मोठा झाल्यावर पालकांना प्रश्न पडतो की, ‘माझ्या नंतर या मुलाला कोण सांभाळणार ?’

बदलापूरमधील मुळगाव येथील आधार संस्थेत मतिमंद, ऑटिझम, अपंग, आदी जणांचे वास्तव्य आहे. वयाच्या १८ वर्षापासून ते ७०-७५ वयाचे ज्येष्ठ महिला आणि पुरुष येथे गुण्यागोविंदाने राहतात. आधारच्या बदलापूर संस्थेत २०० आणि नाशिक येथे ५० जणांच्या दैनंदिन दिनचर्येची काळजी आनंदाने घेतली जाते. सर्वांचा दिनक्रम योग, व्यायाम, न्याहरी, जेवण, वैद्यकीय सुविधा, विशेष वैद्यकीय व्यवस्था, नृत्य वर्ग, चित्रकला, क्षमतेनुसार व्यावसायिक प्रशिक्षण, सहल, इ. नियमितपणे  होते. संस्थेचे १३५ कर्मचारी तीन पाळ्यांमध्ये (शिफ्ट) काम करतात. आधार संस्थेचा परिसर स्वच्छ असून वेगवेगळ्या विभागांचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने केले जाते. आधारमधील मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि समाधान हे संस्थेच्या यशाचे गमक आहे. 

या लेखामध्ये तुम्हाला आधार संस्थेची माहिती, संस्थेची कार्यप्रणाली, विशेष मुलांचा प्रवेश आणि प्रशिक्षण, संस्थेची सामाजिक बांधिलकी, इत्यादींची माहिती सांगणार आहोत. त्यासाठी डाव्या बाजूवरील लिंक्सवर क्लिक करा.

‘आधार’ ही केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालय “राष्ट्रीय पुरस्कार” प्राप्त संस्था आहे.

- श्री. विश्वास गोरे 
अध्यक्ष : आधार संस्था
पत्ता – १०२, श्रद्धा सबुरी अपार्टमेंट,भगवती शाळेसमोर,
विष्णुनगर, नौपाडा, ठाणे (पश्चिम), - ४०० ६०२
दूरध्वनी क्र. ०२२-२५४२६७५३/२५३४१७०८ 
इ मेल – vishwasgore@hotmail.com
संकेतस्थळ - http://www.adhar.org/

 

संकलन आणि शब्दांकन -
विनीत मासावकर
vinit.masavkar@pif.org.in 

 

3.5
Average: 3.5 (2 votes)
Your rating: None