Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

करिअर प्रशिक्षण

करिअर प्रशिक्षक ही जीवनाची महत्वाची पायरी आहे. आयुष्यात एक ध्येय ठरवणे आणि त्या दिशेने वाटचाल करणे. ध्येय हे प्रामाणिकपणे साध्य करण्यासाठी कष्ट आणि संयम ठेवून यशस्वीपणे ध्येय गाठण्याची तयारी पाहिजे. ध्येयाचे नियोजन, व्यवस्थापन, वेळेची सांगड या गोष्टी जुळवून घेतल्या पाहिजेत. उद्योग आणि व्यवसायाच्या विविध संधी उपलब्ध आहेत. त्याचा सकारात्मकरीत्या लाभ घेतला पाहिजे.

करिअर सुरु करताना काही पर्याय आपण स्वतः साठीच उपलब्ध करून घेतले पाहिजेत. उदा. जर नोकरी मिळाली नाही तर आपण स्वयं रोजगाराच्या दृष्टीकोनातून विचार सुरु केला पाहिजे. लहान-मोठा व्यवसाय किंवा उद्योगधंदा सुरु करावयास हवा. स्वतःमधल्या चांगल्या गुणांचा शोध घेऊन त्याचा विकास स्वयं रोजगारामध्ये करता यायला पाहिजे. प्रशिक्षण संस्थांकडून माहिती गोळा केली पाहिजे. तांत्रिक व आर्थिक बाबी आणि समस्या यांचा सखोल अभ्यास केला पाहिजे. रोजगारासाठी सर्वसाधारण बाजार आणि जागतिक बाजार यांच्या अर्थशास्त्राचे गणित समजून घेतले पाहिजे. स्वयं रोजगाराच्या नवीन संधी शोधल्या पाहिजेत.

‘ थेंबे थेंबे तळे साचे ‘ या युक्तीप्रमाणे जास्त पैसे कमावण्याचे मार्ग शोधून जोखीम उचलली पाहिजे. जागतिकीकरणाचा फायदा स्वतःच्या प्रगतीसाठी उचलता आला पाहिजे, याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे.  

 

- विनित मासावकर

4.75
सरासरी 4.8 (4 votes)
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation