Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

उद्योजकता

उद्योजगता

व्यवसायाच्या लहान-लहान संकल्पनेतून उद्योग निर्माण होतो.विशिष्ट ध्येयाच्या निर्मितीतून उद्योगजगताची निर्मिती होत असते. उद्योगासाठी भांडवल, आवश्यक संसाधाने, बाजार, कर्मचारी वर्ग इत्यादी बाबींची आवश्यकता असते. आपण स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकतो. स्वतःचा व्यवसाय सुरु करताना व्यवसायाला लागणाऱ्या आवश्यक गोष्टीचा अभ्यास करणे जरुरीचे आहे.

उदा. व्यवसायाच्या कायदेशीर बाजू, तांत्रिक आणि आर्थिक गणिते, नफा –तोटा अशा अनेक बाबी समजून घेतल्या पाहिजेत. व्यवस्थितपणे एकदा सर्वगोष्टी समजून घेतल्या तर उद्योग सुरळीत सुरु करता येतो. व्यवसाय चांगला चालू आहे असे समजल्यावर त्याच्या विकासाकडे आणि वृद्धीकडे लक्ष दिले पाहिजे.

व्यवसायाची वाढ होत असताना कर्मचाऱ्यांनकडे लक्ष दिले पाहिजे. कारण कर्मचाऱ्यांच्या कर्तृत्वामुळे व्यवसायाची वृद्धी आणि प्रगती होत असते. व्यवस्थापनाचे व्यवसायावर नियंत्रण असणे फार महत्त्वाचे आहे. कारण उद्योगातल्या कुठल्याही विभागाची पकड सैल झाली, तर त्याचा विपरीत परिणाम व्यवसायावर होऊ शकतो. शिस्त आणि नियंत्रणामुळे उद्योगाच्या विकासाला भरभराटी प्राप्त होते. उद्योजगतेची निर्मिती होत असताना चौफेर सामाजिक भान ठेवणे देखील तितकेच गरजेचे आहे.  

 

- विनित मासावकर

3.916665
सरासरी 3.9 (12 votes)
तुमचे रेटिंग

व्यवसायाचा आराखडा कसा लिहावा? त्यात कोण कोणते मुद्दे असावे ह्या बद्दल सांगाल का?

»
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation