Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

विशेष मुलांचे शिक्षण

विशेष मुलांचे शिक्षण
सौजन्य - indianexpress.com

सर्वसामान्य मुलांपेक्षा कमी – अधिक प्रमाणात ज्या मुलांमध्ये जन्मत: किंवा अपघाताने शारीरिक अथवा मानसिक अपंगत्व येते. अशा मुलांचा समावेश विशेष मुलांमध्ये होतो. स्पेशल मुलांसाठी शिक्षणाची पद्धत ही वेगळ्या रचनेच्या मांडणीत असल्यामुळे अशा मुलांसाठी त्यांच्या सोयींनुसार शाळांची उभारणी करण्यात येते. 

विशेष मुलांमध्ये अंधत्व, कर्णबधिरत्वस, अस्थिविकलांगता, मानसिक विकलांगता, बहुविकलांगता, मतिमंद, गतीमंदत्व, ऑटिझम, इत्यादी प्रकार येतात. शिक्षकांनादेखील विशेष प्रशिक्षण देऊनचमुलांना शिकवण्यासाठी तयार केले जाते. अंधत्वव असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ब्रेल लिपीचा उपयोग केला जातो. कर्णबधिरत्व विद्यार्थ्यांना श्रवणयंत्रांद्वारे शिकवण्यास मदत होते, तर मुक्या विद्यार्थ्यांना विशिष्ट हावभाव आणि प्रकारांद्वारे शिकवले जाते. अपंगत्वाचे अनेक प्रकार असल्यामुळे, त्यानुसार विद्यार्थ्यांना शिक्षक विविध माध्यमांद्वारे शिकवतात. मतिमंद आणि गतीमंद विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा आणि गतीचा वेग हा सर्वसामान्य वेळेपेक्षा कमी असतो. म्हणून अशा मुलांना समजून घेऊन त्यादृष्टीने शिक्षक त्यांना शिकवतात. 

विशेष मुलांचे शिक्षक प्रथमत: त्यांचे पालक म्हणजेच आई-वडिल असतात. त्यानंतर पालकत्वाची धुरा शिक्षकांकडे दिली जाते. विशेष मुलांचे शिक्षण हे त्याच्या शारीरिक अपंगत्वावर मात करण्याचे प्रभावी माध्यम आहे. शिक्षण हे त्यांना आत्मविश्वास आणि जगण्याची दिशा देतात. कुठलाही न्यूनगंड न बाळगता ही मुले विविध क्षेत्रात पारंगत होतात. विशेष मुलांच्या शिक्षणामुळे ती समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यास मदत होते. शिक्षण आणि प्रशिक्षणामुळे विशेष मुलांची प्रगती होऊन तसेच स्वावलंबी बनून स्वतःच्या पायावर उभी राहतात.

 

- विनित मासावकर
  vinit.masavkar@pif.org.in
 

 

 

2.666665
सरासरी 2.7 (3 votes)
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation