Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

औपचारिक शिक्षण आणि प्रशिक्षण

सर्वसाधारण शिक्षणामध्ये प्रामुख्याने बालवाडी १ ली ते १० पर्यंतचे शिक्षण आणि  इतर खेळातील कला कौशल्य, मुलांची जडणघडण आणि शिक्षकांचा दृष्टिकोन महत्त्वाचा ठरतो.

बालवाडी शिक्षण
साधारणत: २ ते ५ या वयोगटातील मुलांना बालवाडीमध्ये प्रवेश दिला जातो. या ठिकाणी मुलांना अभ्यासाची प्राथमिक ओळख ह  वेगवेगळ्या खेळातून, चित्रातून होतअसते.यामध्ये पालेभाज्या, फळे, प्राणी, पक्षी, खेळातील साहित्य आणि वस्तू यांची ओळख मुलांना करून दिली जाते. त्याचबरोबर मुलांना  वेगवेगळे खेळ खेळायला शिकवले जाते. 

१ ली ते १० वी पर्यंतचे शिक्षण 
साधारणता ५ व्या किंवा ६ व्या वर्षी मुलामुलींना १ ली च्या वर्गामध्ये प्रवेश दिला जातो. १ली ते १०वी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण त्यांना यादरम्यान मिळत असते. यामध्ये १ली पासून अक्षर ओळख व्हावी, म्हणून बाराखडी पासून त्यांच्या शिक्षणाला सुरुवात होते. तसेच भारतातील वेगवेगळ्या प्रांतातील भाषा, गणित, इतिहास, समाजशास्त्र, भूगोल, पर्यावरण, निबंध लेखन, पत्र लेखन, सारांश लेखन, वक्तृत्व कौशल्य तसेच वेगवेगळ्या खेळातील कौशल्य व त्यातील प्रगती या काळात विद्यार्थ्यांची जडणघडण  होत असते. विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्याचा पाया शाळेतील शिक्षणामध्ये तयार होत असतो. 

इतर कलाकौशल्य
शालेय शिक्षणाबरोबरच प्रत्येक विद्यार्थ्याला काही ना काही प्रकारच्या क्रीडा प्रकारात रस असतो. त्यामुळे खो-खो, कबड्डी, क्रिकेट, फुटबाल, आट्यापाट्या, हॉकी, बुद्धिबळ, केरम टेनिस, पोहणे, लांब उडी, नेमबाजी, वक्तृत्व, लेखन करणे, कविता करणे या प्रकारामध्ये विशेष आवड असते. शिक्षणाव्यतिरिक्त  इतर कलाकौशल्यासाठी पालकांनी आणि शिक्षकांनी प्रोत्साहन देण्याची सर्वात जास्त गरज असते. इयत्ता ४थी आणि ७वी मध्ये स्कॉलरशिपसारख्या स्पर्धा परीक्षांमधून विद्यार्थ्यांची बौद्धिक आणि मानसिक चाचणी आणि हुशारीची कल्पना कळते.  

शिक्षकांचा दृष्टीकोन
शालेय जीवनात विद्यार्थ्यांना शिकवताना शिक्षकांचा दृष्टीकोन हा अत्यंत सकारात्मक असायला हवा. कारण या काळात विद्यार्थ्यांना सर्व गोष्टींची माहिती हळूहळू आणि नव्याने कळत असते. पालक   आणि शिक्षक यांच्याकडून विद्यार्थीदशेत मुले भरपूर प्रमाणात ज्ञान ग्रहण करतात. त्याचा उपयोग त्यांना आयुष्यभरासाठी होतो.

 

- अभिजीत कोळपे

4
सरासरी 4 (2 votes)
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation