Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

सहाय्यक निबंधकाची पाहणी

सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित संस्थेचे लेखापरीक्षण झाल्यानंतर तो लेखापरीक्षण अहवाल सहाय्यक निबंधक कार्यालयात सादर केला जातो.  सहाय्यक निबंधक लेखापरीक्षण अहवालामध्ये खालील बाबी तपासून पाहतात.

● लेखापरीक्षकाच्या नेमणुकीचा ठराव केला आहे का? तसेच लेखापरीक्षकाने त्यास संमतीपत्रक दिले आहे का? तपासले जाते.

● लेखापरीक्षकाने नफा-तोटा पत्रक, ताळेबंद, आर्थिक पत्रके हे नमुना ‘न’ प्रमाणे असल्याचे पहिले जाते. 

● लेखापरीक्षण अहवालामध्ये संचालक मंडळाची यादी जोडली आणि संचालक मंडळाचा कालावधी नमूद केल्याचे पाहतात. 

● गृहनिर्माण संस्थेच्या थकबाकीदार सदस्यांची यादी जोडणे बंधनकारक आहे. 

● संस्थेतील त्रुटी व सुधारणा आणि लेखापरीक्षकाचे शेरे व सूचना नमूद असल्याचे पहिले जाते. 

● लेखापरीक्षकाने नाव, पत्ता, दूरध्वनी, लेखापरीक्षण कालावधी, संस्थेचे सभासद, सभा, सामान्य शेरे आणि सूचना नमूद केल्याचे तपासले जाते.   

● गृहनिर्माण संस्था फायद्यात आहे की तोट्यात हे पहिले जाते.

● गृहनिर्माण संस्थेला आर्थिक वर्षासाठी दिलेला वर्ग (ग्रेड) तपासाला जातो. 

 

- मनिषा राऊत 
शासकीय प्रमाणित लेखापरीक्षक
संपर्क – ९२६०५३१३९७/९३२५५४०६९१ 
इ मेल – manisharaaut@gmail.com      

 

 

0
No votes yet
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation