Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

लेखापरीक्षकाचे दायित्व

लेखापरीक्षकाने अहवाल तयार करताना जबाबदारीने काम करावे लागते. त्यासंदर्भातील आवश्यक बाबी –

● गृहनिर्माण व्यवहारामध्ये वैयक्तिक खर्च नमूद केला आहे का ? याची पडताळणी करणे.

● संस्थेने केलेल्या खर्चात उद्देशपूर्ती झाली असल्याचे पाहणे.

● पुस्तकी नोंदी तपासणे.

● कायदा, नियम व पोटनियामानुसार आवश्यक पुस्तके संस्थेने ठेवली असून त्याच्याशी ताळेबंद आणि नफा-तोटा पत्रक खर्च पडताळणी करून पहावा. 

● आर्थिक वर्षातील ताळेबंद आणि नफा-तोटा पत्रक तपासून त्याबाबत शेरा आणि सूचना नमूद कराव्या.

● संस्थेची माहिती, लेखापरीक्षकाचा अनुभव व ज्ञान आणि शासन व निबंधकाची परिपत्रके, सूचना, संस्थेचे पोटनियम,  महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम यांचा अभ्यास करून लेखापरीक्षण झाल्यानंतर त्यानुसार अहवाल सादर करावा लागतो. 

● लेखापरीक्षकाने संस्थेचे वार्षिक आर्थिक व्यवहार पत्रके तपासून ही पत्रके संस्थेचे दफ्तर कागदपत्रे व संस्थेचे सभा वृतांत, इ. बाबींशी जुळत असल्याची खात्री करावी. त्यासंबधी स्पष्ट उल्लेख लेखापरीक्षण अहवालात करावा.    

● लेखापरीक्षकाने शासकीय कायदे आणि नियमांमध्ये होणाऱ्या सुधारणा किंवा बदल याची इत्यंभूत माहिती ठेवून त्याबाबत संस्थेला कळवणे. लेखापरीक्षण माहितीबाबत वेळोवेळी अद्ययावत (अपडेटेट ) असणे.

 

- मनिषा राऊत
शासकीय प्रमाणित लेखापरीक्षक
संपर्क – ९२६०५३१३९७/९३२५५४०६९१ 
इ मेल – manisharaaut@gmail.com      

 

 

0
No votes yet
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation