Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

लेखापरीक्षणाची आवश्यकता आणि फायदे

महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६० कलम (८१)(१)(ब) अंतर्गत सहकारी गृहनिर्माण संस्थांचे लेखापरीक्षण करून घेणे बंधनकारक आहे. सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये कोणतेही गैरप्रकार घडू नये, चुका होऊ नये, त्रुटी किंवा दोष तसेच अफरातफर अशा गोष्टींना आळा घालण्यासाठी लेखापरीक्षणाची आवश्यकता आहे. गृहनिर्माण संस्थेचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी तसेच कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये याची काळजी घेतली जाते. 

संस्थेची आर्थिक स्थिती आणि सत्यता, लिखीत दस्तऐवज, व्यवहार, आदी बाबी समजण्यास मदत होते. सहकारी संस्था कायदा, नियम आणि उपविधीप्रमाणे गृहनिर्माण संस्थेचे कामकाज चालणे बंधनकारक आहे. त्यानुसार संस्थेची तपासणी आणि विविध कागदपत्रांची पडताळणी केल्यास विविध गोष्टी स्पष्टपणे नमूद होतात. 

लेखापरीक्षकाने मान्य केलेली हिशोब पत्रके ही त्या संस्थेच्या आर्थिक स्थितीचे प्रतिबिंब समजली जातात. दरवर्षी नित्यनियमाने लेखापरीक्षण केल्याने आर्थिक व्यवहार अचूक राहतात. लेखापरीक्षणातील नोंदी कायदेशीर मानल्या जातात. संस्थेच्या कामकाजातील चुका, आर्थिक गैरव्यवहार, अफरातफर, लबाडी, उघडकीस आल्याने संबंधित व्यक्तीवर लेखापरीक्षणातील नोंदी-पुराव्यानूसार कारवाई करता येते. लेखापरीक्षण केल्यामुळे गृहनिर्माण संस्थेचा कारभार अधिक कार्यक्षम आणि निर्दोष होण्यास फायदा होतो. शासकीय संपत्ती कर, प्राप्तीकर, व्यवसाय कर आकारताना लेखापरीक्षण पत्रकाचा उपयोग होतो.  

गृहनिर्माण संस्थेचे कामकाज पारदर्शकपणे सुरु राहणे, हे संस्थेच्या दृष्टीने आणि अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष, पदाधिकारी आणि सदस्य यांच्या हिताचे असते. 

 

- मनिषा राऊत
शासकीय प्रमाणित लेखापरीक्षक
संपर्क – ९२६०५३१३९७/९३२५५४०६९१ 
इ मेल – manisharaaut@gmail.com      

 

0
No votes yet
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation