Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

विमा प्रतिनिधी (एजंट) निवडताना...

विमा प्रतिनिधी (एजंट) निवडताना...
सौजन्य -stratbeans.com

आरोग्य विम्याची रक्कम, विमा पत्रकाची (पॉलिसी) निवड करताना सर्वप्रथम विमा प्रतिनिधी (एजंट) योग्य निवडणे महत्वाचे आहे. विमा प्रतिनिधीची निवड चांगल्याप्रकारे पडताळणी करून केल्यास त्याचा परिणाम दूरगामी आणि हितकारक ठरतो. 

विमा प्रतिनिधी निवडताना मध्यस्थाची भूमिका मोलाची ठरते. व्यावसायिक आणि पूर्णवेळ विमा क्षेत्रात काम करणारी व्यक्ती आणि ग्राहकाचे हित जपणारा विमा प्रतिनिधी योग्य मार्गदर्शन करण्यास मदत करतो.

● सामाजिक ओळखीशी संबंधित असणारा विमा प्रतिनिधी शोधल्यास विविध प्रश्नांचे निरसन होण्याचा सल्ला घेता येतो.   

● विमा प्रतिनिधीचे स्वत:चे कार्यालय, कर्मचारी वर्ग आणि स्वतंत्र पायाभूत सुविधेने सज्ज असल्यास एखाद्या आपत्कालीन क्षणी स्वत:ला आणि कुटुंबाला उपयोगी होतो. 

● विमा प्रतिनिधी विमा क्षेत्रातील विविध कंपन्यांशी निगडीत असावा. कारण तुमच्या सोयीनुसार आर्थिक क्षमतेप्रमाणे तो वेगवेगळ्या योजना आणि पर्याय सांगू शकतो. 

उदाहरणार्थ, कॅशलेस सुविधांचे जास्तीत जास्त जाळे असणारी रुग्णालये विमा प्रतिनिधी आस्थापनाच्या संपर्कात असतात. त्यामुळे त्याचा फायदा विमा प्रतिनिधी ग्राहकाला देऊ शकतो.

● व्यावसायिक विमा प्रतिनिधीमुळे दावा मिळवण्यास मदत आणि मार्गदर्शन मिळते. त्यामुळे तुम्हाला अडचणी येत नाहीत आणि वेळ वाचतो. त्यामुळे व्यावसायिक विमा प्रतिनिधीला प्राधान्य द्यावे.

● व्यावसायिक विमा प्रतिनिधी फसवणूक, विम्यातील मर्यादा किंवा इतर धोके यांपासून सावध करतो. पॉलिसीतील फायदे आणि मर्यादा सांगून ग्राहकाला जागृत करतो.

● विमा प्रतिनिधीकडे  सक्षम यंत्रणा, वेळेवर स्मरण, आरोग्य विमा नुतनीकरण करण्याकरिता स्वतंत्र व्यवस्था असल्यामुळे वेगवेगळ्या सुविधा देण्यास मदत करतो.

● विमा क्षेत्रात होणारे बदल, आर्थिक घडामोडी, नवीन विमा योजना, इत्यादींची माहिती विमा प्रतिनिधी ग्राहकाला देतो. विमा क्षेत्रातील अद्ययावत माहिती ग्राहकाला वेळेवर दिल्यास त्याचा फायदा होतो. 

 

- सचिन नलावडे
   विमा मार्गदर्शक
   संपर्क – ९८६७७०८०२४
   इ-मेल –
snalawade11@gmail.com

 

 

 

0
No votes yet
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation