Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

आरोग्य विम्याचे प्रकार

आरोग्य विम्याचे प्रकार
सौजन्य -biztositas-kgfb.hu

आरोग्य विमा हा कौटुंबिक आणि वैयक्तिक असतो. बहुतेक वेळा विमा काढणाऱ्या व्यक्तीला वैयक्तिक विमा काढावा की कौटुंबिक विमा याबद्दल निर्णय घेताना अडचण येते. त्यामुळे विमा प्रतिनिधीकडून ग्राहकाने दोन्ही प्रकारातील फरक जाणून घेणे महत्वाचे आहे. 

आरोग्य विमामध्ये कुटुंबाच्या व्याख्येत आई,बाबा, स्वत:, पत्नी आणि मुले यांचा समावेश होतो. मोठ्या भावाने जर आरोग्य विमा घेतला तर लहान भाऊ/बहिणीला त्यांच्या वयाच्या २५ व्या वर्षापर्यंत कौटुंबिक विमा पत्रात समाविष्ट केले जातात. योग्य विम्याची निवड करण्यासाठी खालील मुद्द्यांचा विचार करा.

● वैयक्तिक आरोग्य विमा हा प्रत्येक व्यक्ती व त्याची विमा रक्कम मर्यादा निवडीवर प्रिमीयम भरावा लागतो. कौटुंबिक आरोग्य विम्यासाठी सर्वांना सामाईक रक्कम भरावी लागते. 

● समजा, पती,पत्नी, दोन मुले यांचा कौटुंबिक विमा असेल, तर विम्याचा प्रिमीयम भरणे सुलभ आणि सोयीस्कर असते. वैयक्तिक विमा घेताना प्रिमीयमची रक्कम विम्यानुसार ठरवली जाते. कुटुंबामध्ये एखादी व्यक्ती गंभीर आजारी असून ती रुग्णालयात दाखल असेल, तर अशावेळी कौटुंबिक विमा घेणे हिताचे ठरते.

● आयकर कायदा १९६१, सेक्शन ८० ड अंतर्गत स्वत: किंवा कौटुंबिक विमासाठी भरलेल्या प्रिमीयमवर आयकरामध्ये सूट दिली जाते. 

● आरोग्य विमा हा एक वर्षाचे विमा कव्हर करतो. या कालावधीत काही घडले नाही, तर वैयक्तिक विमा पत्र (पॉलिसी) दरवर्षी ठराविक दराने (५ ते १०%) नो क्लेम बोनस स्वरुपात विमा रक्कम वाढवत जातात. या बोनसला ५०% विमा रकमे इतकी मर्यादा असते. म्हणजेच सलग दरवर्षी नो क्लेम बोनस आपल्या विमा रकमेची मर्यादा दीड पर्यंत नेऊ शकतो.

कौटुंबिक विमा घेताना काही विमा कंपनी नो क्लेम बोनस देतात. तर काही विमा कंपनी देत नाहीत. त्याऐवजी नो क्लेम सूट नुतनीकरण (प्रिमीयममध्ये) देतात. 

(टीप: लेखात नमूद केलेला कालावधी,रक्कम आणि टक्केमध्ये बदल होऊ शकते.)    

- सचिन नलावडे 
   विमा मार्गदर्शक
   संपर्क – ९८६७७०८०२४
   इ-मेल – snalawade11@gmail.com

 

 

0
No votes yet
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation