Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

आरोग्य विम्याची गरज

आरोग्य विम्याची गरज
सौजन्य -goodmoneying.com

आरोग्य विमा ही अतिशय महत्वाची बाब बनली आहे. वैद्यक शास्त्राचे अत्याधुनिक शोध हे मानवी जीवनाचे आयुर्मान वाढण्यास उपयुक्त ठरत आहे. प्रभावी व गुणकारी औषधनिर्मिती आणि  निष्णात डॉक्टरांचा संघ यांमुळे शहरी भागासोबतच ग्रामीण क्षेत्रातही आरोग्य सुविधा हळू हळू पोहचत आहेत. 

Ω आरोग्याची समस्या उद्धभवण्याची कारणे -

● बदलती जीवनशैली, ताणताणाव, व्यायामाचा अभाव यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष केले जाते. 

● वातावरणातील प्रदुषण, फळे आणि भाज्यांवर केलेली रासायनिक फवारणी, कृत्रिमरित्या पिकवलेली फळे, अन्नधान्यात आढळणारी भेसळ आणि घसरलेला दर्जा, इत्यादींमुळे आरोग्यावर परिणाम होतो.

● बदललेल्या जीवनशैलीमुळे मधुमेह, हृद्य रोग, कर्करोग, एड्स, इ. व्याधींमुळे कमी झालेली वयोमर्यादा.

● एका संशोधनातून असे दिसते की, ‘आरोग्य विमा असलेल्या रुग्णांना अत्याआधुनिक व चांगले उपचार,सेवा आणि सुविधा मिळाल्याचे दिसते.’ 

● घरातील आर्थिक संकल्पामध्ये (बजेट)  आरोग्याला प्राधान्य द्यायला हवे. सर्वसामान्यांना वैद्यकीय खर्च खिशाला परवडणारा राहिलेला नाही. त्यासाठी आरोग्यासाठी आर्थिक तरतूद करणे महत्वाचे आहे. 

● घरातील वयोवृद्ध, आजारी व्यक्ती अचानक रुग्णालयात दाखल झाल्यावर घरातल्या कमावत्या व्यक्तीवर आर्थिक भार येतो. त्यामुळे आरोग्य विमा असलयास आर्थिक मदत होते.           

एखाद्या समस्येला सामोरे जाण्यासाठी सुरुवातीपासून तयारी केली, तर उपचार योग्य वेळेत होण्यास मदत होते. हे सूत्र आरोग्य विमासाठी देखील लागू होते. 

 

- सचिन नलावडे 
  विमा मार्गदर्शक 
  संपर्क – ९८६७७०८०२४
  इ-मेल –
snalawade11@gmail.com

 

0
No votes yet
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation