Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

आधारचे समुपदेशन

आधारचे समुपदेशन

मुलाचा संस्थेमध्ये प्रवेश झाल्यानंतर तो संस्थेत मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या रुळण्यासाठी थोडा वेळ लागतो. मुलांना संस्थेत रुळण्यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी लागतो.    

पालकांचे समुपदेशन करणे, ही एक आव्हानात्मकता असते. कारण मुलाला घरातून संस्थेमध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय हा मुलाच्या हितासाठी घेण्यात आला आहे. त्यामध्ये पालकांचा कोणताही स्वार्थ नाही, हे पालकांना पटवून द्यावे लागते. संस्थेमध्ये मुलाला ठेवणे म्हणजे त्याला समाजामध्ये आणणे होय. हे मुलाच्या दृष्टीने हिताचे आहे. याचा पालक जेवढ्या लवकर स्वीकार करतील, तेवढे ते मुलासाठी फायदेशीर ठरते. 

● आपले मुल‘विशेष मुल’ आहे, याचा पालकांनी लवकरात लवकर स्वीकार करणे आवश्यक आहे. 

● देशात आधार पहिली संस्था असून तेथे प्रशिक्षित कर्मचारी वर्ग आहे.

● पालकांची संस्था असल्याने मुलांच्या घरच्या अनुभवांचा फायदा संस्थेला झाला. 

● कुठला मुलगा कधी आक्रमक होतो, शांत कसा होतो, मुलांना कसे हाताळावे, आदीं गोष्टी संस्थेतील लोकांना माहित आहे.

प्रत्येक मुलाचा शैक्षणिक आणि वैद्यकीय अहवाल दर तीन महिन्यांनी पालकांना दिला जातो.        

‘आधार’ ही केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालय “राष्ट्रीय पुरस्कार” प्राप्त संस्था आहे.

- श्री. विश्वास गोरे 
अध्यक्ष : आधार संस्था
पत्ता – १०२, श्रद्धा सबुरी अपार्टमेंट,भगवती शाळेसमोर,
विष्णुनगर, नौपाडा, ठाणे (पश्चिम), - ४०० ६०२
दूरध्वनी क्र. ०२२-२५४२६७५३/२५३४१७०८ 
इ मेल – vishwasgore@hotmail.com
संकेतस्थळ - http://www.adhar.org/


संकलन आणि शब्दांकन -
विनीत मासावकर
vinit.masavkar@pif.org.in

 

 

3.5
सरासरी 3.5 (2 votes)
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation