Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

आधारची सामाजिक बांधिलकी

आधारची सामाजिक बांधिलकी

आधारमध्ये मुंबई, ठाणे, डोंबिवली, सातारा, नागपूर, नाशिक, रायगड, दिल्ली,कर्नाटक, मध्य प्रदेश, झारखंड, दुबई, इ. स्थानिकांपासून विविध राज्यातील आणि परदेशातील मतिमंद व्यक्तींचा समावेश आहे. त्यामुळे देशातील प्रत्येक राज्यात मतिमंदांसाठीचे पालकत्व स्वीकारणाऱ्या संस्था वाढणे आवश्यक  आहे. 

कुटुंबामध्ये आई-वडिलांना नोकरी करणे क्रमप्राप्त आहे. मतिमंद मुलांना अठरा वर्षापर्यंत कौटुंबिक आधार हा महत्वाचा असतो. त्याचे भाऊ किंवा बहिण यांना त्यांचे स्वतंत्र आयुष्य असून ते त्यांच्या कामांमध्ये व्यस्त असतात. अशा वेळी अठरा वर्षानंतर मतिमंद मुलांचा सांभाळ कसा करावा ? ही गुंतागुंत आई-वडिलांपुढे उभी राहते. आई-वडिलांना असे वाटते,की ‘आपला मुलगा असल्यामुळे त्याचा सांभाळ आपण करावा. आपण आपली जबाबदारी दुसऱ्यावर टाकू नये’. हा समज पालकांच्या मनात असतो. मुलाची जबाबदारी आणि आधारमधील प्रवेश हा मुलाच्या सुखासाठी घेतलेला निर्णय आहे, असे आई-वडिलांना पटवून द्यावे लागते. त्यासाठी पालकांचे समुपदेशन करावे लागते.  

‘आधार’ ही केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालय “राष्ट्रीय पुरस्कार” प्राप्त संस्था आहे.

- श्री. विश्वास गोरे 
अध्यक्ष : आधार संस्था
पत्ता – १०२, श्रद्धा सबुरी अपार्टमेंट,भगवती शाळेसमोर,
विष्णुनगर, नौपाडा, ठाणे (पश्चिम), - ४०० ६०२
दूरध्वनी क्र. ०२२-२५४२६७५३/२५३४१७०८ 
इ मेल –
vishwasgore@hotmail.com
संकेतस्थळ -
http://www.adhar.org/

 
संकलन आणि शब्दांकन -
विनीत मासावकर
vinit.masavkar@pif.org.in

 

0
No votes yet
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation