Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

आधारची कार्यपद्धती

आधारची कार्यपद्धती

आधारमधील ‘स्वच्छता’ ही आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. एका डॉर्मेटरीमध्ये एक हेल्पर, केअर टेकर, हाउस मास्टर आणि सोशल वर्कर असतात.  अशा पाच डॉर्मेटरी चांगल्या सोयी-सुविधांनी सुसज्ज आहेत. सकाळी योग वर्ग घेतले जातात. प्रशिक्षित शिक्षक मुलांना व्यावसायिक प्रशिक्षण देतात. विशेष मुलांसाठी विशेष शिक्षकांची उपलब्धता देखील आहे. हस्तकला आणि चित्रकलेसाठी स्वतंत्र शिक्षक आहेत. शनिवार आणि रविवार या दिवशी नृत्याचे क्लासेस घेतले जातात. आधारमध्ये प्रत्येक सण आनंदाने साजरा केला जातो. २६ जानेवारी, १५ ऑगस्ट आणि १ मे या दिवशी पालकांची सभा घेतली जाते.

आधार संस्थेमध्ये टप्याटप्याने होत असलेले बदल अनुभवावरून करण्यात आलेले आहे. वैद्यकीय विभागात अतिदक्षता केंद्राची व्यवस्था केली गेली आहे. तिथे उपचार पूर्व आणि उपचारानंतर वैद्यकीय सुविधा उपलब्ध असून काही मुलांची विशेष काळजी घ्यावी लागते. डॉक्टर आणि त्यांचे सहकारी हे वैद्यकीय विभागात उपलब्ध असतात. समजा, एखादा मुलगा आजारी पडला, तर ‘आधार’द्वारे त्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले जाते आणि त्यावर उपचार केले जातात. त्यासोबत संस्थेचा व्यक्ती आजारी मुलाची काळजी घेण्यासाठी त्याच्यासोबत असतो.   

आधारमध्ये स्वतंत्रपणे स्वयंपाक घर असून जेवणाची वेगळी व्यवस्था केलेली आहे. वेगवेगळ्या वयानुसार मुलांचे आणि व्यक्तींचे गट तयार केले असून त्यांची योग्यप्रकारे देखभाल घेतली जाते. संस्थेत काही विशेष मुलांची काळजी अतिशय काटेकोरपणे घ्यावी लागते, त्यांचे जेवण, अंघोळ, शी-शू, वैद्यकीय तपासणी, इ. बाबी नियमित आणि व्यवस्थितपणे कराव्या लागतात. संस्थेत प्रत्येक कार्यप्रणालीची नोंद ठेवली जाते, कारण तीन पाळ्यांमध्ये (शिफ्ट) काम होत असल्याने प्रत्येक गोष्टीचा अहवाल (रिपोर्ट) काम करताना महत्वाचा असतो.     

मुलांना सहलीला नेण्याची व्यवस्था देखील आधारद्वारे करण्यात येते. मुलांना फिरण्याची व्यवस्था देखील आहे. संस्थेची स्वत:ची  रुग्णवाहिका आणि बस देखील आहे. संस्थेचा स्वतंत्र दुग्ध प्रकल्प (डेअरी प्रोजेक्ट) आहे. संस्थेतील मुलांसाठी रोज ५० लिटर दुधाची आवश्यकता असते. नऊ म्हशी आणि दोन गायी संस्थेकडे आहे. त्यातून दुधाची निर्मिती डेअरी प्रोजेक्टमधून केली जाते. दुग्ध प्रकल्पातून संस्थेला स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहे. 

‘आधार’ ही केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालय “राष्ट्रीय पुरस्कार” प्राप्त संस्था आहे.

- श्री. विश्वास गोरे 
अध्यक्ष : आधार संस्था
पत्ता – १०२, श्रद्धा सबुरी अपार्टमेंट,भगवती शाळेसमोर,
विष्णुनगर, नौपाडा, ठाणे (पश्चिम), - ४०० ६०२
दूरध्वनी क्र. ०२२-२५४२६७५३/२५३४१७०८ 
इ मेल –
vishwasgore@hotmail.com
संकेतस्थळ -
http://www.adhar.org/


संकलन आणि शब्दांकन -
विनीत मासावकर
vinit.masavkar@pif.org.in

 

 

0
No votes yet
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation