Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

आधारमधील प्रशिक्षण

आधारमधील प्रशिक्षण

आधार ही पालकांची संस्था आहे. ‘फर्स्ट कम...’च्या तत्वावर येथे विशेष व्यक्तींना प्रवेश दिला जातो. साधारणपणे ७०च्या खाली बुद्ध्यांक (आय.क्यू.) असणाऱ्या व्यक्तीला आधारमध्ये प्रवेश आहे. त्यानंतर संबधित व्यक्तीच्या  पालकाला आधारचे सदस्यत्व दिले जाते. पालक आणि सामाजिक बांधिलकीतून येणाऱ्या देणगीतून आधार संस्थेचे कार्य अविरतपणे वर्षाचे ३६५ दिवस सुरु असते. 

मतिमंद मुलांच्या क्षमता पाहून त्यांना प्रशिक्षण दिले जाते. मेणबत्ती बनवणे, डस्टर तयार करणे, कागदी पिशव्या बनवणे, इ. बाबींचे प्रशिक्षण दिले जाते. प्रत्येक मतिमंद व्यक्तीचा वेगवेगळा बुद्ध्यांक (इंटेलिजन्ट कोशन्ट/आय.क्यू.) असतो. उदा. ३० ते ५० आणि ५० ते ७० पर्यंतचा बुद्ध्यांक विविध व्यक्तींचा असतो. आय.क्यू.पाहून आणि मुलांच्या आवडीनुसार प्रशिक्षण दिले जाते.  

फाइल्स तयार करणे, फ्लॉवर पॉट बनवणे, अगरबत्तीचे पॅकिंग करणे, नक्षीकाम करणे, शिवणकाम करणे, आदी प्रशिक्षण मतिमंदांना दिले जाते. वेगवेगळ्या तयार केलेल्या वस्तू प्रदर्शनांमध्ये ठेवल्या जातात. संस्थेमध्ये येणारे पालक, नातेवाईक, मित्र-मैत्रीण संस्थेतील व्यक्तींनी तयार केलेल्या वस्तू खरेदी करतात किंवा भेट(गिफ्ट) देण्यासाठी घेऊन जातात. 

‘आधार’ ही केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालय “राष्ट्रीय पुरस्कार” प्राप्त संस्था आहे.

- श्री. विश्वास गोरे 
अध्यक्ष : आधार संस्था
पत्ता – १०२, श्रद्धा सबुरी अपार्टमेंट,भगवती शाळेसमोर,
विष्णुनगर, नौपाडा, ठाणे (पश्चिम), - ४०० ६०२
दूरध्वनी क्र. ०२२-२५४२६७५३/२५३४१७०८ 
इ मेल – vishwasgore@hotmail.com
संकेतस्थळ - http://www.adhar.org/


संकलन आणि शब्दांकन -
विनीत मासावकर
vinit.masavkar@pif.org.in

 

 

 

 

 


 

0
No votes yet
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation