Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

सी.एस.मधील करीयरच्या संधी

सी.एस.मधील करीयरच्या संधी
सौजन्य - www.companysecretary.in

कंपनी सेक्रेटरीचे कार्यक्षेत्र कंपनी कायद्याच्या कक्षेत असते. कंपनी सेक्रेटरीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्ही नोकरी करू शकता किंवा स्वतंत्र व्यवसाय करण्याची संधी तुम्हाला आहे. एखाद्या प्रथम श्रेणी दर्जाच्या व्यवस्थाकाइतकाच कंपनी सेक्रेटरीचा दर्जा असतो. व्यावसायिक म्हणून कंपनी सेक्रेटरी विविध कंपन्यांना आपल्या कायदेविषयक सेवा पुरवते.

एल.एल.बी. उत्तीर्ण झालेली व्यक्ती विधीज्ञ(वकील) असून भारतीय दंड संहिता, सामान्य कायदे यासंदर्भात कार्य करते. सी.एस. करणाऱ्या विद्यार्थ्याने एल.एल.बी. केल्यास ते ज्ञान त्याला पूरक ठरते.  सी.एस. आणि एल.एल.बी. या दोन्ही अभ्यासक्रमातील विषय, कायदे परस्पर उपकारक व ज्ञानवृद्धी करणारे आहेत. 

कंपनी सेक्रेटरीला कंपनी अंतर्गत कायदेशीर तज्ज्ञ, कॉर्पोरेट नियोजन, संचालक मंडळाचा सल्लागार, आदी जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. सी. एस. कंपनीत कायदा अधिकारी, कायदेशीर मार्गदर्शक, कायदा प्रतिनिधी, अनुपालन (कम्प्लायन्स) अधिकारी  आणि सॉलिसीटर  पदांवर काम करतो. 

परदेशातही कंपनी सेक्रेटरी व्यवसायात योग्य संधी  उपलब्ध आहेत. या पदासाठी वेतन श्रेणी आणि इतर सोयी-सुविधा चांगल्या स्वरुपात असतात. 


- प्रा. गजानन नेरकर
कंपनी सेक्रेटरी
संचालक – सक्सेस प्रोफेशनल अॅकॅडमी,
करीअर मार्गदर्शक 
संपर्क – ९८९०६६६७६५
इ मेल - 
gajanannerkar@gmail.com

 

4
सरासरी 4 (2 votes)
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation