Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

कंपनी सेक्रेटरीच्या कामाचे स्वरूप

कामाचे स्वरूप
सौजन्य -trade.indiamart.com

कंपनी सेक्रेटरीचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर एखाद्या कंपनीत जाऊन प्रशिक्षणासह अनुभव घेणे अनिवार्य केले आहे. ती कंपनी ‘इन्स्टिटय़ूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया’कडे नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. तसेच एखाद्या कंपनी सेक्रेटरीच्या हाताखाली काम केल्यास त्या अनुभवाचा फायदा होतो.  

कंपनी सेक्रेटरीचे बहुतेक काम हे कायदेशीर गोष्टींशी निगडीत असते. संचालक मंडळाला कंपनी कायदेविषयक सल्ला देऊन मार्गदर्शन करणे, कंपनीचा वार्षिक अहवाल तयार करणे, कंपनीच्या होणाऱ्या बैठकांमध्ये मुद्दे काढून इतिवृत्त लिहिणे, कंपनी कायदे अंतर्गत कागदपत्रे – इ अर्ज भरणे. त्यासोबतच कंपनीच्या भागधारकांची विश्वासार्हता राखणे, पारदर्शी स्वरुपात कंपनी व्यवस्थापन करणे, सेबीशी (सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया) पत्रव्यवहार करणे यांसारखी अनेक कामे कंपनी सेक्रेटरीला करावी लागतात. 

कंपनी सेक्रेटरी हा कंपनीचा कायदेशीर प्रमुख असल्यामुळे कंपनीच्या आर्थिक आणि कायदेशीर बाबींची जबाबदारी सी.एस.ची असते.  

 

- प्रा. गजानन नेरकर
कंपनी सेक्रेटरी
संचालक – सक्सेस प्रोफेशनल अॅकॅडमी,
करीअर मार्गदर्शक 
संपर्क – ९८९०६६६७६५
इ मेल - 
gajanannerkar@gmail.com

 

3.666665
सरासरी 3.7 (3 votes)
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation