Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

करसवलतीसाठी गुंतवणूक

करसवलतीसाठी गुंतवणूक
सौजन्य - myitreturn.com

सर्वसाधारणपणे गुंतवणूक करताना लोक दोन गोष्टी लक्षात ठेवतात. पहिली म्हणजे आयकरामधून कर सवलत मिळावी. दुसरी म्हणजे भविष्यात आर्थिक समस्या उद्धभवल्यास अतिरिक्त खर्चाची तरतूद करण्यासाठी.  
गुंतवणूकदाराकडे गुंतवणूक करताना वेगवेगळे पर्याय उपलब्ध असतात. गुंतवणूक करताना स्वत:च्या उत्पन्नाशी ताळमेळ राखून आणि भविष्यकालीन नियोजन करून करणे आवश्यक आहे. बहुतेक गुंतवणूकदारांचे उत्पन्न व्यवस्थित असून देखील त्यांना करसवलत मिळवता येत नाही. 

Ω करसवलतीसाठी गुंतवणूकीचे पर्याय -  

● पब्लिक प्रॉविडंट फंड 
● बँकेतील मर्यादित गुंतवणूक - चालू खाते, बचत खाते, रिकरिंग खाते आणि मुदत ठेव. 
● ज्येष्ठ नागरिकांना रु. १,००,००० पर्यंत करसवलत फॉर्म १५ एच अंतर्गत मिळते. 
पुनर्विक्रीद्वारे घर (रिसेल फ्लॅट) विकत घेतल्यास कर सवलत मिळते.
● सोन्यातील गुंतवणूकीमध्ये करसवलत मिळते. सोने तारण ठेवून कर्ज घेतल्यास कर्जावरील व्याजदर कमी असतो. 
● शेतजमीन विकत घेऊन त्याचा वापर शेतीसाठी किंवा कृषी उत्पादनासाठी वापर केल्यास करसवलत मिळते.

विमा अंतर्गत कर वजावट (Tax Deduction)  केले जाते. त्यामध्ये जीवन विमा आणि वैद्यकीय विमा यांचा समावेश होतो. 

● जीवन विमा रु. १,००,००० पर्यंत असल्यास फॉर्म ८०/सी अंतर्गत कर वजावट दिली जाते.
● वैद्यकीय विमा रु. १,००,००० पर्यंत असल्यास फॉर्म ८०/डी अंतर्गत कर वजावट मिळते.
● व्यक्तीच्या अपंगत्वाची टक्केवारी ४०% किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास फॉर्म ८०/यु अंतर्गत कर वजावट दिली जाते. 

(टीप: लेखात नमूद केलेली रक्कम आयकर विभागाच्या नियमानुसार बदलत असते.) 

 

- महेश मोरे
अकाउंटंट 
प्रथम इन्फोटेक फाउंडेशन,
पत्ता – ७८/ए,कामगार नगर,
एस.जी.बर्वे मार्ग, कुर्ला (पूर्व)
मुंबई – ४०० ०२४
इ मेल – mahesh.more@pif.org.in
वेबसाईट -  www.pif.org.in

 

0
No votes yet
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation