Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

आयकर नोटीस टाळण्यासाठी...

आयकर नोटीस टाळण्यासाठी...
सौजन्य - www.moneycontrol.com

आपण आयकर पहिल्यांदा भरताना कदाचित चूक होण्याची शक्यता असते. अशा वेळेला आपण सावधगिरी बाळगली. सनदी लेखापाल (चार्टर्ड अकाउंटंट) किंवा आयकर रिटर्न भरणाऱ्या अनुभवी व्यक्तींची मदत घेतल्यास फायदेशीर ठरते. 

Ω आयकर भरताना घ्यावयाची काळजी -

● तुम्ही व्यवहार करत असणारी रक्कम ही मोठी असल्यास योग्य पॅनकार्ड क्रमांक नमूद करावा. जर पॅन क्रमांक नमूद केला नाही किंवा चुकीचा पॅन लिहिला, तर तुमच्यावर आयकर विभागाकडून दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता आहे. तसेच तुमच्या बँक खात्यावर जमा होणारी परताव्याची रक्कम मिळण्यात अडचणी निर्माण होतील. 

● तुमचे उत्पन्न आणि खर्च यांचा योग्य ताळमेळ असणे आवश्यक आहे. तुम्ही काही व्यवहारांची माहिती आयकर विभागाला दिली नाही आणि कर पडताळणीत तुमचे उत्पन्न, गुंतवणूक आणि खर्च यासंबंधी योग्य माहिती मिळाली प्राप्तीकर विभागाला मिळाली, तर आयकर नोटीसला सामोरे जाण्याची शक्यता असते. कारण तुमच्या पॅन क्रमांकावरून आर्थिक व्यवहारांची माहिती आयकर विभागाला मिळते. 

● तुम्ही आयकर पात्र असाल, तर कर भरणे आवश्यक आहे. काही व्यक्ती करपात्र असून कर भरत नाहीत, त्यामुळे त्यांना दंड भरावा लागतो. 

● आयकर खात्याने दिलेल्या मुदतीमध्ये कर भरणे महत्वाचे आहे. तुम्ही करभरणा केला नाही आणि प्राप्तीकर खात्याने ठरवलेल्या दिनांकच्या आत रिटर्न फाइल केले नाही. तर तुम्हाला दंड भरावा लागतो. 

● तुमची बचत आणि गुंतवणूक एकूण उत्पन्नात समाविष्ट करणे आवश्यक आहे. शेअर, मुदत ठेव, बॉंडस, बचत, पीपीएफ, पोस्ट ऑफिसमधील ठेवी, इत्यादींची माहिती एकूण उत्पन्नात समविष्ट केल्यास त्याचा फायदा करमुक्तता मिळण्यास होतो.  

● आयकर खात्याच्या नोटीसीला उत्तर देणे, हे तुमच्या हिताचे आहे. तसे न केल्यास दंड आणि व्याजाची रक्कम वाढत जाण्याची शक्यता असते. हे तुमच्यासाठी अडचणीचे ठरू शकते. 

‘उपचारापेक्षा प्रतिबंध करणे’ हे सूत्र आयकर भरताना  लागू पडते. त्यामुळे कर भरताना योग्य काळजी घ्या आणि आयकर नोटीसपासून लांब रहा. 

 

- महेश मोरे
अकाउंटंट
प्रथम इन्फोटेक फाउंडेशन,
पत्ता – ७८/ए,कामगार नगर,
एस.जी.बर्वे मार्ग, कुर्ला (पूर्व)
मुंबई – ४०० ०२४
इ मेल – mahesh.more@pif.org.in
वेबसाईट -  www.pif.org.in

 

0
No votes yet
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation