Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

फॉर्म १६

फॉर्म १६
सौजन्य - cleartax.in

फॉर्म १६ अशा व्यक्तीला प्रदान करण्यात येतो जो व्यक्ती एखाद्या संस्थेत वेतनांवर (पगार)  कार्यरत असतो.

कर्मचाऱ्याच्या वेतनातून काही रक्कम वजा करून त्याला वेतन प्रदान केले जाते. वेतनातून कापल्या गेलेल्या रक्कमेस टीडीएस  (TAX DEDUCTED AT SOURCE) असे संबोधले जाते.

वर्षाच्या अखेरीस कर्मचाऱ्याचे वेतन आणि करपत्रक सादर केले जाते, या पत्रकाला फॉर्म १६ म्हटले जाते.

फॉर्म १६ हे वेतन पुरावा आणि सरकारला टीडीएस (TDS) भरले असल्याची नोंद म्हणून ओळखले जाते.

फॉर्म १६ हा फक्त वेतन धारकास दिला जातो.

जर एखादा कर्मचारी दोन वेगवेगळ्या संस्थेमध्ये काम करत असल्यास त्या व्यक्तीस  दोन्ही संस्थांकडून फॉर्म १६ मिळवणे आवश्यक आहे. ते फाईल रिटर्न करताना दाखवणे महत्वाचे असते. तसेच, जर का कर कापला जात नसेल तर फॉर्म १६ ची गरज भासत नाही. 

तुम्ही ज्या आस्थापनात (कंपनी) काम करता, त्या कंपनीच्या लेखापाल विभागात (Account Department) फॉर्म १६ अर्ज करू शकता. त्यानंतर तुम्हाला फॉर्म १६ आयकर भरण्यासाठी उपलब्ध करून दिला जातो.        

 

- महेश मोरे
अकाउंटंट
प्रथम इन्फोटेक फाउंडेशन,
पत्ता – ७८/ए,कामगार नगर,
एस.जी.बर्वे मार्ग, कुर्ला (पूर्व)
मुंबई – ४०० ०२४
इ मेल – mahesh.more@pif.org.in
वेबसाईट -  www.pif.org.in

 

0
No votes yet
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation