Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

पुनर्विक्रीद्वारे घर (रिसेल फ्लॅट) खरेदी

पुनर्विक्रीद्वारे घर (रिसेल फ्लॅट) खरेदी
सौजन्य - www.moneycontrol.com

तुम्ही पुनर्विक्रीद्वारे घर (रिसेल फ्लॅट) खरेदी करताना ज्या विक्रेत्याकडून घर खरेदी करत आहात त्याचे करारपत्र (Agreement) पाहणे महत्वाचे आहे. करारपत्रात आवश्यक ती कागदपत्रे जोडले असल्याची खात्री करा. उदा. सूची क्र. २, सात बारा, बांधकाम नकाशा, रहिवासी ना-हरकत प्रमाणपत्र, गृहनिर्माण संस्थेचे नोंदणीकृत प्रमाणपत्र, इ. पाहून घ्या.  ज्याच्याकडून मालमत्ता विकत घेणार आहात, त्याच्याकडून मालमत्तेवर जितक्या वेळा खरेदी-विक्री झाली आहे, ती सर्व करारपत्रे असणे आवश्यक आहे. 

ज्या गृहनिर्माण संस्थेमध्ये तुम्ही सदनिका (फ्लॅट) विकत घेत आहात. त्या संस्थेतील अध्यक्ष,सचिव, कोषाध्यक्ष आणि पदाधिकारी यांच्याशी संबंधित मालमत्तेविषयी माहिती घ्यावी. विकत घेत असलेली सदनिकेची थकबाकी आणि गृहकर्ज आहे का याबाबत चौकशी करावी. महानगरपालिका कर, वीज थकबाकी, मासिक सेवाशुल्क थकबाकी, इत्यादी भरले असल्याची खात्री करा.  

विक्रेत्याचे गृहनिर्माण संस्थेशी सर्व व्यवहार पूर्ण असल्यावरच तुम्हाला ‘ना हरकत प्रमाणपत्र’ संस्थेकडून देण्यात येईल. महाराष्ट्र शासन सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या अंतर्गत गृहनिर्माण संस्था नोंदणीकृत झाली आहे का, ते पहा. सदनिका विकत घेताना पार्किंगसाठी गृहनिर्माण संस्थेत जागेची व्यवस्था केलेली आहे का, तसेच त्या जागेचे शुल्क द्यावे लागणार आहे की नाही. या सर्व गोष्टी विक्रेत्याला विचारा आणि त्या माहितीची पडताळणी करा. गृहनिर्माण संस्थेचे मानीव अभिहस्तांतरण (डिम्ड कन्व्हेयन्स)  झाले आहे का ? याची विचारणा करा.  घर खरेदीचा व्यवहार करण्याअगोदर या सर्व गोष्टी केल्यास तुम्हाला कुठली अडचण येणार नाही.     


- स्वप्नील डुकरे
  गृहकर्ज वित्तीय सल्लागार
  रुद्र एंटरप्रायजेस 
  दूरध्वनी क्र. ९७७३८९३८८३ 
  इ-मेल- rud.enterprises@gmail.com   

 

5
सरासरी 5 (1 vote)
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation