Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

आयकर फॉर्ममधील दुरुस्ती

आयकर फॉर्ममधील दुरुस्ती
सौजन्य - www.rediff.com

आयकर भरताना फॉर्ममध्ये दुरुस्ती करायची असल्यास तशी सुविधा आयकर विभागाने केली आहे. आयकर विभागाकडून  इन्कम टॅक्स अॅक्ट, कलम १४३ अंतर्गत इंटीमेशन पत्रक काढण्यात येते. इंटीमेशन पत्रकामधील सीपीसी क्र. (CPC No.)हा महत्वाचा असतो. त्याअंतर्गत तुम्ही चुकीच्या गोष्टी पडताळू शकता.  

एक्सएमएल(XML) फाइलमध्ये चुका दुरुस्त करण्याची सुविधा उपलब्ध आहे. आयकर विभागाच्या http://incometaxindia.gov.in या संकेतस्थळावर जाऊन  

My Account -> Rectification -> Rectification upload.          

या पर्यायांवर क्लिक करुन योग्य ती माहिती भरावी.  असेसमेंट वर्ष (Assesment Year) 

आणि सीपीसी क्र. (CPC No.) नंबर अंतर्भूत करून फॉर्म सबमिट करा. त्यानंतर 

रेक्टीफीकेशन (Rectification) केलेली माहिती परत पहा. त्यानंतर रेक्टीफीकेशन (Rectification) आणि  एक्सएमएल(XML) फाइल अपलोड करा. अपलोड फाइलचा रेक्टीफीकेशन क्रमांक (Rectification No.) तसेच अॅक्नॉलेजमेंट क्रमांक (Ackonowledgement No.) दिसेल.  

आयकर खात्याचा दुरुस्ती संदर्भातील इ मेल आल्यानंतर दुरुस्तीसाठी अर्ज (Rectification Request) सात  दिवसात करता येतो. आयकर विभाग तुम्हाला तुमच्या परताव्याची माहिती ऑनलाइन उपलब्ध करून देते. त्यासंदर्भातील परतावा स्थिती जाणून घेण्यासाठी tin.tin.nsdl.com/oltas/refundstatus या लिंकवर क्लिक करा. 


- महेश मोरे
अकाउंटंट 
प्रथम इन्फोटेक फाउंडेशन,
पत्ता – ७८/ए,कामगार नगर,
एस.जी.बर्वे मार्ग, कुर्ला (पूर्व)
मुंबई – ४०० ०२४
इ मेल – 
 mahesh.more@pif.org.in
वेबसाईट -  www.pif.org.in


  

 

0
No votes yet
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation