Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

आयकर फॉर्म भरताना घ्यावयाची काळजी

आयकर फॉर्म भरताना घ्यावयाची काळजी
सौजन्य - taxmantra.com

आयकर फॉर्म भरताना योग्य काळजी घेणे महत्वाचे आहे. आयकर फॉर्म हा ५ प्रकारामध्ये उपलब्ध असतो, आपल्या उत्पन्नाच्या माध्यमानुसार आयकर फॉर्म भरावा लागतो. 

● आयटीआर १ (ITR 1) :- तुमचे उत्पन्न हे वेतन किंवा (निवृत्ती वेतन) पेन्शन, तसेच बँक  बचत खाते, मुदत ठेव रक्कम (Fixed Deposit) आणि १ भाड़े तत्वावरील घर या माध्यमातील असेल तर तुम्हाला आयटीआर १ (ITR 1) फॉर्म भरावा लागतो. 

● आयटीआर २ (ITR 2) :- व्यक्तिगत तसेच हिंदू अनडिवायडेड फॅमिलीमध्ये (HUF) ज्यांचे  करपात्र उत्पन्न हे व्यवसाय मध्यम वगळून येते. त्यांना आयटीआर २ (ITR 2) भरून द्यावा लागतो. 

● आयटीआर ३ (ITR 3) :-  व्यक्तिगत तसेच हिंदू अनडीवायडेड फॅमिली (HUF) ज्यांचे करपात्र उत्पन्न आयटीआर २ (ITR 2) ला सलंग्न असते. तसेच जे एखाद्या फर्ममध्ये भागीदार असून प्रोप्रायटरी व्यवसाय चालवत नाहीत. अशांना आयटीआर ३ (ITR 3) फॉर्म भरावा लागतो.

● आयटीआर ४  (ITR 4) :- व्यक्तिगत ज्याचे उत्पन्न हे सिव्हील कंन्स्ट्रक्शन, वाहतुक सेवा, व्यापार व्यवसाय या माध्यामातुन येते. त्यांनी आयटीआर ४ (ITR 4) फॉर्म भरावा.

● आयटीआर ५   (ITR 5) :- संस्था (Company, AOP-Association of Persons & BOI-Body of Individual)  या  माध्यमातील उत्पन्न  आयटीआर५  (ITR 5) अंतर्गत नमूद करावे लागते.

● आयटीआर ६   (ITR 6) :- कलम ११  अंतर्गत सूट मिळवणाऱ्या  कंपन्यांपेक्षा इतर कंपन्यांचा समावेश आयटीआर ६  (ITR 6) अंतर्गत होतो.

 

● आयटीआर ७   (ITR 7) :-  कलम १३९ (४अ)/ कलम १३९ (४ब) /कलम १३९ (४क)/कलम १३९ (४ड) अंतर्गत परतावा सादर करणे कंपन्यांसह व्यक्तींनादेखील आवश्यक असते.

आयटीआर फॉर्मसाठी http://www.saraltaxoffice.com/resources/it-itr-download.php  या लिंक्सवर क्लिक करा.

दरवर्षी बरेचसे आयटी रिटर्न हे बाद केले जातात, याचे मुख्य कारण म्हणजे चुकीची दिलेली वैयक्तित माहिती. जर का तुम्ही भाड़े तत्वावर किंवा वसतिगृहात रहात असाल तर तो पत्ता  देऊ नका. तुमचा कायमचा पत्ता देणे आवश्यक आहे. जर का तुम्ही तुमचा पॅन नंबर चुकीचा दिलात तर तुमचा फॉर्म हा पुढे न जाता रद्द होऊ शकतो, तसेच तुम्हाला दंड स्वरुपात काही रक्कम भरावी लागते. 

जर तुम्हाला आयकरचा परतावा पाहिजे असल्यास तुमच्या बँक खात्याची माहिती देणे आवश्यक आहे.       

 

- महेश मोरे
अकाउंटंट 
प्रथम इन्फोटेक फाउंडेशन,
पत्ता – ७८/ए,कामगार नगर,
एस.जी.बर्वे मार्ग, कुर्ला (पूर्व)
मुंबई – ४०० ०२४
इ मेल – 
mahesh.more@pif.org.in
वेबसाईट -  
 www.pif.org.in

 

 

0
No votes yet
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation