Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

आयकर भरताना लागणारी कागदपत्रे

आयकर भरताना लागणारी कागदपत्रे
सौजन्य - your24hcoach.com

जी व्यक्ती पहिल्यांदा आयकर भरते, त्या व्यक्तीला आयकर भरण्यासाठी खालील कागदपत्रांची पूर्तता करावी लागते.  

१. करदात्याला त्याच्या चालू आर्थिक वर्षाचा वित्तीय दाखला देणे गरजेचे असते. 

२. करदाता कोणत्याही प्रकारे आपल्या खाजगी वित्तीय व्यवहार  लपवू शकत नाही.

३. आयकर भरताना इन्कम टॅक्स अॅक्ट १९६१ ने ग्राह्य केलेला पॅन क्रमांक सुपूर्द करणे महत्वाचे आहे.

४. करदाता त्याच्या करावरील सूटसाठी इन्कम टॅक्स अॅक्टनुसार वेगवेगळ्या बचतीमधून  करामध्ये सवलत मिळवू शकतो. 

५. उत्पन्न, गुंतवणूक आणि खर्च यांचा आर्थिक तपशील आणि कागदपत्रे. 

उदाहरणार्थ,  

● नॅशनल सेविंग सर्टिफिकेट (NSC)

● एलआयसी पॉलिसी (LIC Policy), विमा हप्ता 

● गृहकर्ज (Housing Loan), इत्यादी. 

आयकराची माहिती भरताना आर्थिक उत्पन्नाच्या सर्व स्त्रोतांची माहिती द्यावी. तसे न केल्यास आयकर खात्याच्या नोटीसला समर्पक उत्तर देणे आवश्यक आहे. 

 

- महेश मोरे
अकाउंटंट 
प्रथम इन्फोटेक फाउंडेशन,
पत्ता – ७८/ए,कामगार नगर,
एस.जी.बर्वे मार्ग, कुर्ला (पूर्व)
मुंबई – ४०० ०२४
इ मेल – 
mahesh.more@pif.org.in
वेबसाईट -  
 www.pif.org.in

 

0
No votes yet
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation