Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

आजार आणि वैद्यकीय उपचार

‘उपचारापेक्षा प्रतिबंध महत्त्वाचा असतो’ ही प्रचलित संज्ञा आहे. मानवाची रोगप्रतिकार शक्ती कमी झाली तर त्याला जंतुसंसर्ग होऊन आजाराची लागण होण्यास सुरुवात होते. आजार आणि रोग या बाबी वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहेत. आजाराचे विविध प्रकार असतात.एखाद्या व्यक्तीमध्ये आजाराची लक्षणे दिसताच त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे. सर्दी, ताप, खोकला, जुलाब, इत्यादी सर्वसाधारण आजारांसाठी प्रथमोपचाराची आवश्यकता असते.

प्रथमोपचारामुळे आजाराची तीव्रता कमी होते. कॅन्सर, हार्ट अटेक यांसारख्या अनेक मोठ्या आजारांना वैद्यकीय उपचारासोबतच आवश्यक पथ्ये पाळावी लागतात.गर्भवती स्त्रीने आहार आचरणात काळजी न घेतल्याने किंवा धुम्रपान केल्याने अपंग, आंधळा, बधिरता, मूकता अशा दोषांची शक्यता असते. चुकीच्या आहार सेवनाने आणि अति व्यायाम, अति श्रम, अपघाताने सुद्धा अनेक आजार निर्माण होतात. हवामान बदलामुळे किंवा ऋतूतील बिघाडामुळे अनेक रोग होतात.

निसर्ग नियमानुसार अनेक बदल शरीरात होतात. तहान, भूक, झोप यांकडे दुर्लक्ष केल्याने अनेक आजारांची समस्या गंभीर रूप धारण करते.नियमित वैद्यकीय उपचार घेतल्याने आजाराची तीव्रता कमी होऊन तो नाहीसा होण्यास मदत होते. आहारचे नियमित सेवन, शरीराची व्यवस्थित काळजी, हवामान बदलानुसार आणि प्रकृतीनुरूप आहारात बदल केले पाहिजे. आजार न होण्यासाठी अगोदरच प्रतिबंध केला, तर वैद्यकीय उपचाराची गरजच भासणार नाही. 

 

- विनित मासावकर

 

2
सरासरी 2 (3 votes)
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation