Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

आरोग्यदायी राहणीमान

आरोग्यदायी राहणीमान
सौजन्य -www.nestle.in

आरोग्यदायी राहणीमान विकसित होण्यासाठी शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि सामाजिक सजगतेची आवश्यकता असते. आरोग्यदायी राहणीमानासाठी पौष्टिक आहाराची आवश्यकता असते. आहाराचे ग्रहण करताना वेळेवर न्याहारी आणि जेवण करायला हवे. आहारात शाकाहार आणि मांसाहाराचा मेळ घातला पाहिजे. व्यायाम आणि योगाने शारीरिक तंदुरुस्ती सुधारते. चुकीच्या जेवण पद्धती बदलून आरोग्यदायी जेवण पद्धती स्वीकारली पाहिजे.

जर मानसिक ताण असेल तर तर त्याचे व्यवस्थापन करता आले पाहिजे. छद जोपासून आनंदी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. स्वच्छतेच्या चांगल्या सवयी अंगिकारल्या पाहिजेत.शरीराच्या प्रत्येक अवयवाची निगा राखली गेली पाहिजे. सामाजिकीकरण आणि नेटवर्किंगचा सहभाग असणेही जरुरीचे आहे. या सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करून राहणीमान आरोग्यदायी बनविले पाहिजे.    

आरोग्याच्या दृष्टीने नेहमी चौकस राहण्याची दृष्टी आपल्याकडे हवी. रोग झाल्यावर त्याच्या उपचारासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, पण रोग होण्यापूर्वी आरोग्याची काळजी घेतली तर निरोगी आरोग्य मिळू शकते. 

 

- विनित मासावकर
  
vinit.masavkar@pif.org.in

 

   

3
सरासरी 3 (3 votes)
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation