Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

Languages

वर्तमान विषय

 

आरोग्यदायी राहणीमान 

आरोग्यदायी  राहणीमान म्हणजे सर्वसाधारण प्रकृती ही शारीरिक, मानसिक आणि सार्वजनिकदृष्ट्या सुदृढ असणे. आरोग्यदायी आहाराची पद्धत ही पोषणमूल्यांनी युक्त असावी. शारीरिक वाढीसाठी व्यायाम आणि योगा आवश्यक आहे. ऋतुमान आणि प्रकृतीनुसार आहारात बदल करावेत. आजार होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय करणे महत्त्वाचे आहे. आनंदी राहणीमान आणि चांगले सुसंवाद हे आरोग्यदायी राहणीमानाचे गमक आहे.

 सकस आहार प्रतिबंधात्मक उपाय | रागाचे व्यवस्थापन |  व्यसनाधीनता | डॉक्टरांचा शोध घ्या 

 

मुलांचे आरोग्य 

समाजाची भविष्यकालीन पिढी सुदृढ असणे आवश्यक आहे, त्यासाठी मुलांचे आरोग्य चांगले असणे महत्वाचे आहे. लहानपणापासूनच पालकांनी मुलांना चांगल्या गोष्टींची सवय लावली पाहिजे. कुठलाही आजार किवा दुखापत झाल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तत्काळ उपचार केल्यास संभाव्य धोके टाळता येतात. किशोरवयीन मुलांना योग्य वयात लैंगिक शिक्षण दिल्यास त्यांच्या हातून चुका होणार नाहीत. संवेदनशील आणि भावनिक मुद्दे नाजूकपणे हाताळले पाहिजेत. यादृष्टीने विचार केले,तर मुलांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य आनंदी राहण्यास मदत होईल.. 

पोषणमूल्ये आणि तंदुरुस्ती नवजात बालकांची काळजी | वाढ आणि विकास | आजार, लागण आणि दुखापत 

महिलांचे आरोग्य

स्त्री ही कुटुंबाची पोषणकर्ती असते. म्हणून स्त्रीचे आरोग्य उत्तम असणे आवश्यक आहे. महिलांचे आरोग्य हे वेगळ्या धाटणीचे असते. म्हणून त्यांना उद्भवणाऱ्या समस्यादेखील भिन्न स्वरूपाच्या असतात. स्त्रीचा दुसरा जन्म म्हणजे गरोदरपण होय. गरोदरपणात महिलांची काळजी घेणे हे गरजेचे असते. महिला या कधी-कधी स्वतःहून स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात, ते सर्वप्रथम टाळले पाहिजे. कुटुंब सुदृढ राहण्यासाठी कुटुंब कर्ती निरोगी असणे महत्त्वाचे आहे.

कुटुंब नियोजन व जन्म नियंत्रण |गरोदरपणा | नैराश्य | गर्भपात

पुरुषांचे आरोग्य

पुरुष हा कुटुंबाचा प्रमुख कर्ता असतो. कुटुंबाची सर्व वैयक्तिक-आर्थिक-सामाजिक जबाबदारी पुरुषावर अवलंबून असते. दैनंदिन व्यवहार आणि धावपळीत मानसिक आणि शारीरिक ताणतणावांना सामोरे जावे लागते. या सर्वांमधून आरोग्याकडे लक्ष देणे, पुरुषांना कठीण असते. परंतू आरोग्य सुदृढ असले तरच सर्व कामे सुरळीत पार पाडतात. म्हणून पुरुषांचे आरोग्य चांगले राहिले पाहिजे.

व्यसनाधीनता | चिंताग्रस्त-भययुक्त विकारलैंगिक आरोग्य आणि लैंगिक सहवासातून उद्भवणारे व्याधी

आजार व वैद्यकीय उपचार

आजारावर प्रतिबंधात्मक उपायाने मात करता येते. आजारावर वैद्यकीय उपचार हे प्रभावी ठरतात. आजार झाल्यास पहिल्यांदा प्रथमोपचार करावेत. त्यानंतर डॉक्टरांकडे जावे. ऋतू बदलानुसार सर्दी, खोकला, ताप इत्यादींसारखे आजार होतात. रोगप्रतिकार शक्ती चांगली असल्यास आजाराचा प्रादुर्भाव होत नाही. वैयक्तिक स्वच्छतेने आरोग्याची काळजी चांगल्याप्रकारे होते. योग्य आणि वेळेवर औषध हाच वैद्यकीय उपचार आहे.

सर्वसाधारण आरोग्याची काळजी| आजार व उपचार |प्रथमोपचार | औषधे आणि औषधोपचार 

मुलाखती 

 

 

© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation
अधिक पहा