Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

स्वतःचा पैसा

स्वतःचा (वैयक्तिक) पैसा म्हणजे पैशाचे अभ्यासपूर्ण आणि योग्यरीतीने केलेले व्यवस्थापन होय. रोजच्या जीवनात पैशाचे अनन्य साधारण महत्त्व आहे. कुटुंबाचा महिन्याचा अर्थसंकल्प (बजेट) म्हणजे तारेवरची कसरतच असते. अन्न, वस्त्र आणि निवारा या मुलभूत गोष्टी पूर्ण झाल्यावर, बचत, गुंतवणूक, खर्च याचा मेळ साधावा लागतो.  

कुटुंबाचा विमा म्हणजे एक संरक्षणाचे पाठबळच म्हणावे लागेल. म्हणून कुटुंबाचा विमा उतरवणे महत्वाचे असते. निवृत्तीनंतरचा विचारसुद्धा नोकरीवर असतानाच करून  त्याचे नियोजन व्यवस्थित करावे. ज्यामुळे निवृत्तीच्या काळात समस्या उद्भवणार नाहीत. मुलांच्या उच्च शिक्षणासाठी बचत आणि गुंतवणूकदेखील महत्त्वाची आहे. बँकिंगमध्ये बचत खाते, दीर्घ मुदत ठेवी, कर्ज योजना या सुविधांचा वापर करावा. बचतीच्या सोप्या- सोप्या युक्त्यांचे नियोजन केले पाहिजे. 

उदा. बचत गट, पतपेढ्या, भिशी आदींमध्ये बचत करावी. वैयक्तिक गरजेची चांगल्या प्रतीची वस्तू विकत घ्यायची असल्यास त्याची माहिती घेऊन किंमत काढावी, ती वस्तू घेताना भाव करता आला पाहिजे. वस्तूचे भाव कमी करण्यामध्ये महिला हुशार असतात. तातडीची गरज किंवा महत्वाची गुंतवणूक असल्यासच कर्ज घेण्याचा विचार करावा. कर्जाशी सामना करण्याची मानसिक आणि शारीरिक ताकद माणसामध्ये असली पाहिजे. 

क्रेडीट कार्ड्सचा योग्य वापर आणि नियमांची अंमलबजावणी केल्यास त्याचा फायदा होतो. आपल्या जमा-खर्च-गुंतवणुकीची सर्व माहिती घेऊन करभरणा करावा आणि त्याचा भविष्यात आपल्याला फायदा होतो. म्हणून स्वतःचा (वैयक्तिक) पैश्याचे योग्य नियोजन करता आले पाहिजे.

 

- विनित मासावकर

 

3
सरासरी 3 (2 votes)
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation