Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

पैशाशी संबंधित संकल्पना

पैसा

पैसा हे दैनंदिन जीवनातील निगडीत वस्तूंचे चलन होय. पैसा आणि त्याच्या संबंधित संकल्पना या विविध प्रकारच्या असतात. पैसा आला म्हणजे अर्थशास्त्र आले. ‘अर्थ’ म्हणजे पैसा आणि पैशाचे शास्त्र म्हणजे ‘अर्थशास्त्र’ होय. बॅंक ही पैशांच्या संकल्पानातील अविभाज्य घटक आहे. वैयक्तिक बचत, दीर्घ बचत, कर्ज इत्यादी बाबी बँकांमार्फत केल्या जातात. पैशाचा जमा-खर्च आणि नफा- तोटा याचा उल्लेख अकाउंटीगमध्ये केला जातो.

गुंतवणूक ही भविष्यकालीन परिस्थितीसाठी आणि संकटसमयी फायदेशीर ठरते. गुंतवणुकीचे अनेक पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. अभ्यासपूर्ण विचार करून गुंतवणूक ही टप्याटप्प्यात करावी. शेअर बाजार, मुच्युअल फंड, वस्तू बाजार, बॉंड, आदींमध्ये थोडी-थोडी गुंतवणूक केल्यास भविष्यातील त्याचा परतावा फायदेशीर ठरतो.विमा हा स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी संरक्षण कवच आहे. मोठी गुंतवणूक करण्यासाठी किंवा मुलभूत गरजांसाठी आवश्यक असल्यास कर्ज काढावे आणि ठराविक कालमर्यादेत त्या कर्जाची परतफेड करावी. कर हा सर्वांसाठी आवश्यक आहे.

सरकारी आणि पायाभूत सुविधांचा खर्च हा करातून मिळालेल्या उत्पनातून होतो. म्हणून प्रत्येक व्यक्तीने प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर भरणे आवश्यक आहे. पैशांशी संबंधित संकल्पना यासाठी कायदे आणि नियमाचे नियंत्रण आणि त्याची काटेकोर अंमलबजावणीसाठी कॉर्पोरेट गवर्नन्समार्फत केली जाते. अशाप्रकारे पैशांशी संबधित संकल्पना एकमेकांशी निगडीत असून त्या परस्परांवर अवलंबून असतात


- विनित मासावकर

3.5
सरासरी 3.5 (4 votes)
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation