Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

रक्तदान करण्याचे निकष

रक्तदान करण्याचे निकष
सौजन्य - kanpurbloggers.blogspot.com

रक्तदान हे अठरा ते साठ वयातील कुठलीही निरोगी व्यक्ती करू शकते. ज्या वेळेला रक्तदात्याला रक्तदान करायचे असते, तेव्हा त्याला एक प्रश्नावली व संमतीपत्र देण्यात येते. 

रक्तदात्याची जीवनपद्धती, आवडी, आजार उदा. कावीळ झाली आहे का ?, लैंगिक संबंध किंवा एस.टी.डी. बाबत अशी सामान्य तसेच वैयक्तिक स्वरुपाची माहिती घेतली जाते.

Ώ रक्तदात्यांसाठी प्रश्नावली - 

■ नाव, पत्ता, जन्मदिनांक, वय,लिंग, दुरध्वनी, मोबाईल,ई-मेल, इ.

■ पूर्वी रक्तदान केले आहे का ? किती वेळा ? शेवटच्या रक्तदानाची दिनांक, पूर्वीच्या रक्तदानावेळी त्रास झाला होता का? मागील तीन महिन्यात रक्तदान केले आहे का?

■ कावीळ,हिवताप,एड्स, गुप्तरोगांची बाधा झाली आहे का ?

■ कर्करोग, मधूमेह, टायफाईड, क्षयरोग, कुष्टरोग, हृदयरोग, कावीळ, अलर्जी, दमा, मनोविकार, मूत्रपिंडाचे विकार, फिट्स, गुप्तरोग, इ. त्रास आहे किंवा पूर्वी झाला होता का ?

■ रक्तदान आधीच्या ७२ तासांत मद्य, उत्तेजके, वेदनाशामक, लस, प्रतीजैविके, इ. पदार्थांचे सेवन केले आहे का ?

■ गेल्या १ वर्षभरात मोठी शस्त्रक्रिया किंवा रक्त संक्रमण करण्यात आले आहे का ? 

■ रक्तदानआधीच्या मागील २४ तासांत मद्यपान केले आहे का ?

■ महिला रक्तदात्यासाठी –

  १. गरोदर आहात का ?

  २. गेल्या ३ महिन्यात गर्भपात झाला आहे का ?

  ३. १ वर्षांपेक्षा लहान मुल आहे का ?

  ४. मासिक पाळी सुरु आहे का ?   

प्रश्नावली तपासल्यानंतर सर्वसाधारण जी व्यक्ती रक्तदानासाठी योग्य किंवा पात्र आहे, अशा व्यक्तीचे रक्त घेतले जाते. व्यक्तीचे वजन मोजून त्याचे रक्त घेतले जाते. उदा. ४५ किलो वजन आणि ५५ किलो वजन असणाऱ्या व्यक्तीचे अनुक्रमे ३५० एम.एल. आणि ४५० एम.एल. रक्त घेतले जाते. 

 - डॉ.संदीप साळुंखे
   
वैद्यकीय संचालक (Medical Director)
   
सर जे.जे.महानगर रक्तपेढी
   
संपर्क - ०२२-२३७३५५८५, २३७३३५३१, २३७३३५३२      
   संदर्भ -  उत्पला हेगडे, जनसंपर्क अधिकारी (PRO)
               
सर जे.जे.महानगर रक्तपेढी

 
संकलन – विनित मासावकर
         vinit.masavkar@pif.org.in
5
सरासरी 5 (2 votes)
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation