Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

रक्तदान केल्यानंतर घ्यावयाची काळजी

रक्तदान केल्यानंतर घ्यावयाची काळजी
सौजन्य -www.laibhaari.com

व्यक्तीने रक्तदान केल्यानंतर आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. रक्तदानानंतर काही पथ्ये पाळणे आवश्यक आहे. 

■ रक्तदानानंतर कमीत कमी ४ तास धुम्रपान करू नये.

■ कमीत कमी २४ तासांपर्यंत कोणत्याही प्रकारचे मद्यपान करू नये.

■ रक्तदानाच्या दिवशी जास्तीत जास्त पाणी घेणे.

■ रक्तदानाच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे जड वाहन चालवू नये व अति उष्ण ठिकाणी काम करणे टाळावे. 

■ रक्तदानाच्या दिवशी भरगच्च पोटभरून जेवण करू नये. हलक्या स्वरूपाच्या पदार्थाचे सेवन करावे. 

■ रक्तदानाच्या दिवशी गोड आणि मांसाहार अन्नाचे सेवन करू नये.

■ हातावर व शरीरावर जास्त ताण पडणारे खेळ टाळावे. उदा. क्रिकेट, व्यायाम, गिर्यारोहण, मैदानी खेळ, इ.

■ रक्त काढलेल्या ठिकाणाहून रक्तस्त्राव होत असल्यास हात वर करून त्यावर दाब द्या. 

■ रक्तदात्यास चक्कर अथवा अंधारी येत आहे असे वाटल्यास झोपावे व पायाखाली उशी ठेवावी. तसेच शिबीरातील डॉक्टरांशी तात्काळ संपर्क साधावा. 

■ रक्तदानानंतर काही त्रास झाल्यास त्वरित रक्तपेढीच्या पत्त्यावर संपर्क करावा.

 

रक्तदानादरम्यान आणि रक्तदानानंतर रक्तदात्याने आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

 

- डॉ.संदीप साळुंखे
  वैद्यकीय संचालक (Medical Director)
  सर जे.जे.महानगर रक्तपेढी
  संपर्क - ०२२-२३७३५५८५, २३७३३५३१, २३७३३५३२
  संदर्भ -   उत्पला हेगडे, जनसंपर्क अधिकारी (PRO)
  सर जे.जे.महानगर रक्तपेढी

 

संकलन – विनित मासावकर 
             vinit.masavkar@pif.org.in

 
4.666665
सरासरी 4.7 (3 votes)
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation