Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

ऑटिझम आणि मतिमंद यांमधील फरक

“ऑटिझम” म्हणजे नेमकं काय ते माहित नसल्यामुळे अशा मुलांनाही बरेचदा “मतिमंद” समजतात, पण मतिमंद आणि ऑटिझम यात बराच फरक आहे. मतिमंद मुल जन्मत  तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरून पालकांना लगेच कळत की आपलं बाळ मतिमंद आहे, पण ऑटिझम ग्रस्त बाळ जन्मत तेव्हा बहुतांशी ते चार चौघांसारखंच दिसतं. त्यामुळे ते २-३ वर्षाचं होईपर्यंत त्याच्या पालकांनाही काही कल्पना नसते. कधी कधी तर ८-१० वर्षापर्यंतही लक्षात येत नाही. जशी ती मुलं मोठी होतात तेव्हा त्यांच्या वागणुकीमुळे लक्षात येतं की काहीतरी वेगळ आहे. मतिमंद मुलांचा बुध्यांक सरासरीपेक्षा कमी असतो तर ऑटिझम ग्रस्त मुलांचे बुध्यांक सरासरी म्हणजे ७० च्या वर असू शकतो. ५ टक्के मुलांचा सरासरीहून अधिक म्हणजे १०० पर्यंत असू शकतो. परंतु त्या मुलांना स्वतःला व्यक्त करता येत नसल्यामुळे ह्यांचा उपयोग होईलच असं नसतं. एखाद्या  २५ वर्षाचा मतिमंद मुलाचा बुध्यांक ६ वर्षाच्या मुलाएवढा  असेल तर तो ६ वर्षाच्या मुलाइतक वागतो,बोलतो, समजतो पण ऑटिझम ग्रस्त मुलाचा बुध्यांक चांगला असूनही तो तसं वागू शकत नाही. म्हणूनच अशा मुलांना समजून घेण ही अतिशय अवघड बाब आहे.  

ऑटिझम हा जन्मतः मेंदूतील बिघाडामुळे होतो, आणि तो जेनेटिक डिसऑर्डर आहे. ऑटिझम हा रोग नाही त्यामुळे त्यावर औषधं नाहीत. काही औषधं दिली जातात ती ऑटिझम करता नसून डिप्रेशन किंवा हिंसकपणा आटोक्यात आणण्यासाठी किंवा हायपर अॅक्टीव्हिटी कमी होण्यासाठी असतात. काही मुलांन फिट्स येतात. त्यावर औषधं असतात. बऱ्याच मुलांना पोटाच्या विकाराच्या तक्रारी असतात, त्यावर औषधं असतात पण अशा औषधांनी ऑटिझम बरा होत नाही.

प्रगत देशांमध्ये ऑटिझम वर प्रचंड रीसर्च सुरु आहे, अद्याप तरी त्यातून त्यावर इलाज सापडलेला नाही. अशा परिस्थितीत ह्या मुलाचं काय होणार ही काळजी पालकांना सतावत असते. ऑटिझम पूर्ण बरा होत नसला तरी, जर त्याचं निदान लवकर झालं आणि त्यांना योग्य ते प्रशिक्षण मिळाल तर बऱ्याच प्रयत्नांनी ह्या मुलांना आपण स्वतःच्या पायावर उभं रहायला मदत करू शकतो. त्याकरता हे प्रशिक्षण कसं असतं हे जाणून घेण महत्वाचं आहे.

 

- सुहासिनी मालदे
   फाऊंडर ट्रस्टी - आशियाना ऑटिझम ट्रस्ट,
   आशियाना इन्स्टिट्यूट फॉर ऑटिझम 

 

 
1
सरासरी 1 (1 vote)
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation