Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

मतिमंदत्व

ज्या मुलांचा बुध्यांक सरासरीपेक्षा कमी असतो आणि त्यामुळे ज्यांना सामान्य परिस्थितीशी मिळते-जुळते घेण्यास अडचण निर्माण होते, त्यांना ‘मतिमंद’ असे म्हणतात. तसेच ७० पेक्षा कमी बुध्यांक असलेल्या मुलांना मतिमंद म्हटले जाते. मतिमंदत्वाचे साधारण, मध्यम, व अतिमतिमंदत्व असे तीन प्रकार असतात. 

मतिमंद मुलांमध्ये सुधारणा करण्यासाठी अनेक विशेष शाळा स्थापन करण्यात आल्या आहेत. शैक्षणिकदृष्ट्या मतिमंद मुलांचे शिक्षण देता येण्याजोगे तसेच  कौशल्य शिकविता येण्याजोगे मतिमंद आणि अतिमतिमंद मुलांना शिक्षण देता येणे. हा दृष्टीकोन असतो. मतिमंदाचा बुद्धिगुणांक ५० ते ८० असतो. मुलांना सहाव्या वर्षी लेखन, वाचन, अंकज्ञान शिकू शकत नाही. त्यांना या गोष्टी काही वर्षांनी शिकता येतात. सामान्य व्यक्तीप्रमाणे कुशल व अकुशल गोष्टी त्यांना थोड्या उशिरा येतात. कौशल्य शिकविता येण्याजोगे मतिमंदाचा बुद्धिगुणांक २५ ते ५० च्या दरम्यान असतो. सामान्य व्यक्तींच्या १/३ या वेगाने त्यांची प्रगती होते. या मुलांना शाळेतील विषय येत नाही, पण स्वतःचे संरक्षण करणे, यंत्राबाबत सावधगिरी बाळगणे या गोष्टी येतात. अतिमतिमंद व्यक्तींचा बुद्धिगुणांक २५ पेक्षा कमी असतो. त्या व्यक्तींची इतरांना काळजी घ्यावी लागते त्यातील काही व्यक्तींना जेवता, बोलता येते. पण काही व्यक्तींना सतत आराम करण्याची गरज असते. यांना कुशल, अकुशल असे काहीच शिकविता येत नाही; कारण त्यांची मानसिक वाढ ४ वर्षाच्या मुलांपेक्षा अधिक होत नाही.

मतिमंद शाळेमध्ये विशेष करून त्यांच्या विकासाच्या दृष्टीने त्यांचा अभ्यासक्रम घेतला जातो. या मुलांच्या सुरवातीच्या शिक्षणामध्ये आरोग्यशिक्षण, इतर मुलांबरोबर वागण्याचे शिक्षण, प्राथमिक भाषा शिक्षण, अंकज्ञान आणि किरकोळ कौशल्य याचे शिक्षण तसेच महत्वाच्या वस्तूंची ओळख या गोष्टी शिकविल्या जातात. कौशल्य शिकविता येणाऱ्या मतिमंद मुलांच्या शिक्षणात, ही मुले स्वावलंबी व्हावीत आणि समाजाला उपयुक्त ठरावित, असे प्रयत्न शाळेकडून केले जातात. तसेच त्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी त्यांना व्यावसायिक शिक्षण देखील दिले जाते. मतिमंद मुलांच्या जीवनात बदल घडून आणणाऱ्या अनेक शाळा स्थापन होताना दिसत आहेत.  


- चंद्रकांत शिंदे               

 

4.666665
सरासरी 4.7 (3 votes)
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation