Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

या विभागात

  • राष्ट्रीय उत्पादन (जी.डी.पी. - ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट)

राष्ट्रीय उत्पादन (जी.डी.पी. - ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट)

प्रत्येकजण रोजच्या जीवनात जे काही उत्पन्न मिळवत असतो, त्याची नोंद ही प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ही राष्ट्रीय उत्पादनात (जी.डी.पी.- Gross Domestic Product ) होत असते. एखाद्या ठराविक काळात काढलेल्या जी.डी.पी.वरून त्या राष्ट्रातल्या लोकांच्या राहणीमानाचा दर्जा ठरवणे यासाठीही जी.डी.पी. हे महत्त्वाचे साधन मानले जाते. म्हणून आधी जी.डी.पी. म्हणजे काय? देशांतर्गत होणारे खरेदी-विक्रीचे परिणाम जीडीपीवर कसे होतात? हे समजून घेणे महत्वाचे आहे.

एखाद्या वर्षी त्या राष्ट्रात झालेल्या सगळ्या वस्तू/सेवांच्या मुल्याची बेरीज म्हणजे जीडीपी होय. तर जीडीपीची गरज काय? समजा, एका राष्ट्रात शेतीचे उत्पन्न जास्त आहे. दुसऱ्या राष्ट्रात इलेक्ट्रानिक गोष्टींचे आणि तिसऱ्या राष्ट्रात वाहनांचे तर मग कुठला देश समृद्ध म्हणायचा? हे सहजसाजी ठरवणे सोपे नाही. कारण उत्पादित होणाऱ्या गोष्टींची तुलना होऊ शकत नाही आणि म्हणूनच याला काहीतरी मोजमाप असावे, म्हणून जीडीपीची संकल्पना निघाली.

जी.डी.पी. = सेवा-सुविधा/वस्तूंचा वापर + संपूर्ण गुंतवणूक + सरकारने केलेला खर्च + (निर्यात - आयात)

हे सूत्र कसे आले ते आधी समजून घेऊ. आयात-निर्यात वगळता देशांतर्गत व्यवहाराच जर विचारात घेतले तर राष्ट्रीय उत्पन्न आणि राष्ट्रीय खर्च हे सारखेच असतात. याला कारण असे की एखाद्या गोष्टीची जेव्हा विक्री होते तेव्हा जेवढं उत्पन्न विक्रेत्याला मिळालेलं असतं तेवढाच खर्च खरेदीदाराचा झालेला असतो. सेवा-सुविधा आणि वस्तूंची अंतिम किंमत विचारात घेतली जाते म्हणजे जर एखाद्या वस्तूची विक्री ५० रुपयाला झालेली असेल आणि तीच वस्तू पुन्हा ७० रुपयाला विकली गेलेली असेल. तर व्यवहार हा ५०+७०=१२० रुपये असा न धरता फक्त ७० रुपये असा धरला जातो नाहीतर ते ५० रुपये हे दोनदा मोजल्यासारखे आहेत. तसे होऊ नये म्हणून अंतिम किंमत धरतात. निर्यात जेंव्हा होते तेंव्हा खर्च हा दुसऱ्या राष्ट्राचा झालेला असतो आणि उत्पन्न हे आपल्या देशाचे. तर जेंव्हा आयात होते तेंव्हा खर्च आपल्या देशातील लोकांचे आणि पैसे हे परकीय राष्ट्राला मिळालेले असतात. म्हणून जेव्हा आयात –निर्यात होते तेंव्हा राष्ट्रीय उत्पन्न आणि खर्च हे सारखे नसतात.

जीडीपीला अनेक मर्यादाही आहेत जसे की उत्पादीत होणाऱ्या वस्तू चांगल्या आहेत की वाईट हे पाहिले जात नाही. वस्तूचा दर्जा कमी असेल आणि तरीही ती जर विकली गेलेली असेल. तरी त्याची नोंद जी.डी.पी.त होते. प्रदूषणाचा विचार केला जात नाही. असे असले तरीही जी.डी.पी. ही संकल्पना सर्वत्र प्रगतीच्या मोजमापाच साधन म्हणून वापरली जाते आणि त्यामुळेच ती समजून घेणे महत्वाचे ठरते.

 

- अपूर्व देशमुख

 

4
सरासरी 4 (5 votes)
तुमचे रेटिंग

thanks to the large variety and options available to borrowers the decisions that borrowers need to make on home loans have risen tremendously borrowers in the uk draw more of christmas loans than what they intend to spend instant payday loans the search for matching loan offers starts immediately after the request for online loan is received this will be used as a pretext to smaller payments or payment holidays as the case may be those banks and the thrifts make up the federal home loan bank system fhlbs

»
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation