Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

शेतकरी

१.शेती आपला परंपरागत व्यवसाय असून पारंपारिक व्यवसायातून आपण आधुनिक शेतीकडे कसे आणि का वळलात ?
उत्तर :  नोकरी करत असताना वर्तमानपत्रात एकदा वाचले, की सांगलीचा एक शेतकरी १० गुंठे शेती करून  १० ते १५ लाख रुपये वर्षाला उत्पन्न मिळवतो. एक आठवी शिकलेला शेतकरी चांगली शेतीविषयक चागली माहिती देऊन आपले कर्ज सहज फेडतो. अशा प्रकारे मी आधुनिक शेतीकडे वळलो.

२.नाबार्डचा राष्ट्रीय पुरस्कार हा तुमच्या कोणत्या कार्यासाठी मिळाला आणि त्याचे गमक काय ?
उत्तर : वैयक्तिक शेती करणाऱ्याला नाबार्ड पुरस्कार देत नाही. माझ्या बरोबर दररोज शेती करणाऱ्या शेतकऱ्याला मी दररोज १,००० ते १,५०० रुपये मिळवून देण्याचे काम केलं होतं. आमचा टर्नओव्हर ५३ हेक्टरमध्ये साडे बावीस कोटींचा होता. म्हणून नाबार्ड हा राष्ट्रीय पुरस्कार मला अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या हस्ते देण्यात आला. 

३. आधुनिक शेतीमध्ये कशाप्रकारे केली, त्याचे कोणते फायदे झाले ?
उत्तर : ‘पोलिहाऊस’ पाहिल्यानंतर नोकरी सोडून शेतीत उतरण्याचा निर्णय मी घरच्यांना कळवला. पारंपारिक शेती अशास्वत असल्यामुळे माझा निर्णय घरच्यांना पटला नाही.पोलिटेक्निक हा दोन महिन्यांचा कोर्स केला. कोर्समध्ये जास्त काही समजल नसल्यामुळे तेथील सुभाष गोरे यांना मी सांगितले, की मला पोलिहाऊसवर काम करायचे आहे. मला अनुभव घ्यायचा होता, कारण त्यासाठी मला दहा लाख रुपये कर्ज घ्यायचे होते. वर्षभर मी पोलिहाऊसवर सकाळी सहा वाजता २३ किलोमीटर जायायचो आणि संध्याकाळी सात वाजता घरी यायचो. पोलिहाऊसमध्ये पोलिहाऊसचे पडदे उघडण्यापासून ते बंद करण्याची कामे सुरवातीला चालू केली. त्यानंतर गादीवाफे बनवण्याचे व त्यामध्ये बेसळ टाकायचे, ट्रेप्स म्हणजे किती ब्लूम झालेली फुले 

ही बाजारात पाठवायची. ती किती तास पाण्यात ठेवायची,त्याचा ए.सी. किती असला पाहिजे. या सर्व प्रक्रिया वर्षभरात शिकायला मिळाल्यानंतर मला एक आत्मविश्वास आला की मी ही शेती करू शकतो. त्यानंतर मी एक माझं १० गुंठ्याच प्रपोजल तयार केल. त्यासाठी १२ लाख रुपये खर्च अपेक्षित होता. १० लाख बँकेतून कर्ज आणि २ लाख माझे स्वतःचे होते. हे प्रपोजल घेऊन आम्ही केनरा बँकेत गेलो. मला १ वर्षाचा अनुभव आणि त्यामागील अर्थशास्त्र माहित असल्यामुळे मी हे कर्ज घेण्याचे धाडस केले. फायदा आणि तोट्याचे अर्थशास्त्र माहित असल्याशिवाय बॅंक शेतकऱ्याला कर्ज देत नाही. हे मला कळलं होतं. बॅंकेत घेल्यावर बॅंक अधिकाऱ्यांना सांगितले, की पोलिहाऊसचे प्रपोजल मी आणले आहे. मला पोलिहाऊस तयार करायचे असून दहा ते बारा रोपे ही प्रत्येक पोलिहाऊसमध्ये लागतील. एका फुलाला १रुपये ९६ पैसे खर्च असतो आणि ४ ते ५ रुपये एका फुलामागे मिळणार आहेत. एका दमात हे बॅंक अधिकाऱ्याला सांगितल्यानंतर ते म्हणाले २ ते ३ रुपये एका फुलामागे प्रोफिट. त्यांनी प्रश्न केला की फुले किती निघतील ? मी म्हणालो, ‘४ लाख फुले निघतील आणि ४ रुपये एका फुलामागे मिळाले तरी १६ लाख रुपये वर्षाला मिळतात.’ हे सांगितल्यावर अधिकारी एवढे खुश झाले आणि म्हणाले, ‘ पहिला शेतकरी आम्ही आमच्या बॅंकेत पहिला की त्याला अर्थशास्त्र सांगता येत. ’       

शेतकरी सात-बारा घेऊन बॅंकेत येतात आणि सबसिडी बघून कर्ज मागतात. म्हणून बॅंक त्यांना कर्ज नाकारते. हे मला तेव्हा कळलं. शेती अधिकाऱ्यांनी माझी मुलाखत घेतली आणि त्यांनी सांगितले, की ‘तुम्ही तयारीला लागा आम्ही तुम्हाला कर्ज देतोय.’ तेव्हा मला हे स्वप्नवत वाटलं. 

७ जुलै २००० साली माझा पोलिहाऊस प्रकल्प प्रत्यक्षात आला. रोज सकाळी नवरा आणि बायको ६.०० वाजता पोलिहाऊसमध्ये जायायचो. ६.०० ते ८.०० वाजेपर्यंत शेतात काम करायचो.  पोलिहाऊसमध्ये रोपांची दररोज उंची वाढत असते आणि तो फरक आपल्याला लगेच दिसतो. कार्नेशन ची फुले २१ दिवस टिकतात. १० वर्षात कार्नेशन फुलांचा भाव कमी झाला नव्हता, हे मला माहित होत म्हणून मी कार्नेशन फुले लावण्याचा निर्णय घेतला. अडीच महिन्यानंतर त्याला कळ्या लागल्या. स्वतः काम करत असल्यामुळे फुलाचा दर्जा उत्तम होता. जेथून मी रोप घेतली होती त्या कंपनीमध्ये गेलो. त्यांना सांगितले की माझी फुले आता विक्रीला आली आहेत. फ्लॉवर पॉवर नावाची दिल्लीतील कंपनीचे त्यांनी मला कार्ड दिले आणि त्यांच्याशी बोलून घेण्यास सांगितले. मी मार्केट सर्व्हे केला होता आणि ज्याचा मार्केट सर्व्हे आहे तो या इंडस्ट्रीमध्ये तोट्यात जाणारच नाही. प्रत्येक घरातली बाई ही शेतीतील ८० टक्के कामे करीत असते. पुरुषप्रधान संस्कृती असल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की माझ्यामुळेच हे सर्व चाललं आहे. 

अशा प्रकारे १४ महिन्यात बँकेचे १० लाख रुपये कर्जाची परतफेड केली. 

४.पुण्याच्या आजुबाजूच्या  शहरात ऊस, डाळींब, पालेभाजी अशी पिके घेतली जातात. पोलिहाऊसमध्ये प्रामुख्याने कोणती पिके घेतल्यास त्याचा फायदा होईल ?
उत्तर : पोलिहाऊसमध्ये जो काम करतो. त्याला शेतीविषयक ज्ञान असणे फार आवश्यक आहे. १० गुंठे उघड्यावर शेती केल्यास ३ ते ४ लाख रुपये खर्च येतो . पोलिहाऊसमध्ये शेती केल्यास १० लाख रुपये खर्च येतो. फुले आणि  इंग्लिश भाज्या या प्रामुख्याने कराव्यात. फुले ही सजावटीसाठी लागतात म्हणून डेकोरेटर चांगल्याप्रकाराचा मोबदला देऊ शकतात. इंग्लिश भाज्यांमध्ये ब्रोकोलीज, चायनीज केबे, सेलरी, चेरी टोमेटो, ढोबळी मिर्ची सर्व गोष्टी थोड्या- थोड्या प्रमाणात केल्या. शहरीकरणामुळे हॉटेल वाढत आहे. १२ ते १५ रुपये खर्च येणारा आणि ५० रुपयांमध्ये विकल्या जाणाऱ्या भाज्या पोलिहाऊसमध्ये घ्याव्यात. कारण पोलिहाऊसचा खर्च, बँकेचे व्याज, दर या सर्व गोष्टींचा विचार केल्यास ही पिके फायदेशीर ठरतात. पोलिहाऊसमध्ये मजूर, वीज कमी प्रमाणात लागतात. बाहेरचे कुठले रोग पिकांना होत नाहीत. आपण १०० टक्के सेंद्रीय पद्धत पोलिहाऊसमध्ये उपयोगात आणू शकतो. 

५. पुण्याच्या हवामानाला अनुकूल अशी कुठल्याप्रकारे शेती करणे योग्य ठरेल ?
उत्तर : पुण्यामध्ये ६०,००,००० पेक्षा जास्त लोखासंख्या आहे. या लोकसंख्येला लागणारा भाजीपाला, दुग्ध पुरवठा घेण फार गरजेच आहे. हिवाळा, उन्हाळा आणि हिवाळा हे तिन्ही ऋतुमानाचे नियंत्रण पोलिहाऊसमध्ये होते आणि त्यामध्ये पिके घेतली जातात. शास्वत उत्पन्नासाठी पोलिहाऊस गरजेच आहे. प्रत्येक एक एकरमध्ये पोलिहाऊस असणे गरजेच आहे. पोलिहाऊसच्या आजुबाजूला झाडे लावून वायू किंवा गेसचे आपण नियंत्रण करू शकतो. “पोलिहाऊस” ही शास्वत इंडस्ट्री असून प्रत्येक शेतकऱ्याने पिक पिकवून शहरात विकण्यासाठी नेऊन उत्तम फायदा मिळवू शकतो. 

६. शेतकऱ्यांच्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी कुठले उपक्रम घेतले पाहिजे ?
उत्तर : शेतीसाठी मजूर उपलब्ध होत नाही. शहरातील जी शिकलेली तरुणांनी विक्रीसाठी मदत केली पाहिजे. सुशिक्षित लोक विक्रीत असणे आवश्यक आहेत. कारण आम्हीच उत्पादन काढून ते विकणे जरा अवघड आहे. सरकारी अनुदानासाठी सुशिक्षित तरुणांनी हातभार लावल्यास त्याचा फायदा होईल. प्रभाकर बंडकर या निवृत्त अधिकाऱ्याने आम्हाला अर्थशास्त्राची व्यवस्था बसवून दिली. अर्थशास्त्राचा पाया त्यांनी भारतातील ३,५०० शेतकऱ्यांना सांगितला. शेतीतील क्षेत्रातील निवृत्त अधिकाऱ्यांनी आम्हाला मदत केल्यास त्यांची उत्तमप्रकारे आम्ही देखभाल करू.

७. नाबार्डमार्फत शेतकऱ्याना कशाप्रकारे मदत केली जाते ?
उत्तर : ज्या बँका शेतीसाठी कर्ज देतात, त्या बँकांना वित्तपुरवठा करणारी संस्था म्हणजे नाबार्ड होय. नाबार्ड ही संस्था इतकी चांगली आहे, “१२ वर्षात नाबार्ड या संस्थेत मला एकही मनुष्य भ्रष्टाचार करताना दिसला नाही.” आपण प्रस्ताव दिला की ३० ते ४० दिवसात कर्ज किंवा प्रस्तावानुसार कर्ज मंजुर होते. सांघिकरित्या शेतकऱ्याना (Group of Farmers) नाबार्ड अर्थपुरवठा करते. नवीन तंत्रज्ञानाचा प्रसार, नवीन माणसांसाठीचे शुल्क, इत्यादी खर्च नाबार्ड करते. नवीन प्रकल्पांसाठी नाबार्ड मोठ्या प्रमाणावर वित्त सहाय्य करते. खते, अवजारे यासाठी नाबार्ड भांडवल पुरवते. 

८. अभिनव फर्मास क्लब या उपक्रमाचे विश्लेषण करा.
उत्तर : ४ गावांनी मिळून १७ लोकांचे अभिनव फर्मास क्लब स्थापन केले. महाराष्ट्रात ४३, ७०० खेडी आहे. मुळशी, मावळा आणि हवेली या तीन तालुक्यात अभिनव फर्मास क्लबचे सदस्य आहेत. प्रत्येक सदस्याकडे एक ते दीड एकर शेती करून दररोज एक ते दीड हजार रुपये तो कमावतो. २१६ सदस्यांमधून १०३ शेतकरी फुल शेती, ७३ शेतकरी भाजीपाला, ३७ शेतकरी दुग्ध व्यवसायात आहेत. धान्य, गहू, ज्वारी, बाजरी यामध्ये ९ पारंपारिक शेतकरी काम करतात, या शेतकऱ्यांचे धान्य आमचे शेतकरी विकत घेतो आणि ग्राहकांपर्यंत पोहचवतो. पुण्यासारख्या शहरांसाठी अभिनव फर्मास क्लब काम करतो. साडे तीन करोड चा फायदा आम्हाला देशांतर्गत व्यवसायात झाला आहे. 

९. पुण्यातील शेतकऱ्यांनी शेतीला पूरक असे कोणते व्यवसाय केले पाहिजे ?
उत्तर : महिला बचत गटांना एकत्र घेऊन हार्वेस्टिंग, पेकिंग, ग्रीडीग या प्रक्रिया करणे. शहरांमध्ये प्रत्येक सोसायटीत शेतकऱ्यांचे ओउटलेट असावे. ग्राहकांना लागणारा धान्य, दुध आणि भाजीपाला हे शेतकऱ्यांच्या ग्रुपने पुरवायचे. यामुळे ग्राहकाला कमी रक्कमेत उत्तम माल मिळेल आणि शेतकऱ्याला त्याच्या मालावर ३० टक्के फायदा मिळेल. दुग्ध व्यवसाय यामध्ये ३०० म्हशीचे १० गोठे आमच्याकडे आहे. एक गोठा दरवर्षी १० लाख रुपये कमवून देतो. बाजारात मिळणारे ८० टक्के दुध केमिकलचे असून २० टक्के दुध चांगल्या दर्जाचे आहे. आधुनिकरित्या शेती केल्यास फायदेशीर ठरते. कुक्कुटपालन यामध्ये एका व्यक्तीने २०० गावरान कोंबड्या पाळल्या तर रोज १०० अंडी निघतात. अंड्यामध्ये ८०० रुपये रोज त्या व्यक्तीला मिळतात. “शेती ही शेती नसून कोट्यवधी रुपये मिळवून देणारा व्यवसाय आहे.” शेती हा चिरंतर टिकणारा व्यवसाय आहे. 

१०. तरुणांना शेतीकडे वळण्यासाठी आपण कशाप्रकारे उत्तेजन द्याल ?
उत्तर : अभिनव फर्मास क्लब सुरु करताना सर्व तरुण शेतकरी घेतले होते. कारण जुने लोक नवीन पद्धती स्वीकारण्यास तयार नाही . म्हणून १०० टक्के तरुणांना यामध्ये वाव आहे. सगळा तरुण नोकरीच्या दृष्टीकोनातून काम करतो आहे. व्यावसायिक आणि पोलिहाऊसच्या दृष्टीकोनातून शेती केली केली तर तरुणाचे उत्पन्न अधिक वाढेल. लोकसंख्या ही वाढत आहे आणि शेती कमी होत आहे म्हणून अन्नधान्याचा तुटवडा होत आहे. काही देशात शेतीच होत नाही. अशा देशांना आपण माल निर्यात करून चांगला फायदा मिळवू शकतो. 

 

मुलाखत : ज्ञानेश्वर बोडखे

 

शब्दांकन : हरेश शेळके   

 

4.2
सरासरी 4.2 (10 votes)
तुमचे रेटिंग

Aaj sheti hi kalachi far mothi garaj ahe parantu sheti karnarya tarunanchi sarvach bajuni upexa hot ahe. Mahinyala lakho rupaye kamavnarya shetakari tarunpekshya ath te daha hajar rupaye pagar kamavnara tarun adik pragat vatto. Muli sudha lagnasathi partner nivadtana sheti peksha nokrila jasta pradanya detat hi paristithi badlane far jarur ahe.

»
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation