Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

नेत्रदान

एका व्यक्तीने नेत्रदान केल्यास त्याचा फायदा दोन अंध रूग्णांना दृष्टी मिळण्यासाठी होऊ शकतो. नेत्रदानाचे अर्ज सर्व नेत्रपेढ्यांकडे उपलब्ध असतात. टेलिफोन डिरेक्टरीमध्ये त्या त्या गावातील नेत्रपेढ्यांचे टेलिफोन नंबर दिलेले असतात. नेत्रदानाचा फॉर्म भरला नसला तरी नेत्रदान करता येते.

मृत्यू. झाल्यावर लवकरात लवकर नेत्रपेढीला फोन करून कळवावे लागते. त्यांचे तंत्रज्ञ येऊन डोळे घेऊन जातात. तंत्रज्ञ येईपर्यंत मृत व्यक्तीचे डोळे बंद ठेवायला हवेत. खोलीतलं तापमान थंड हवे. बंद डोळ्यावर ओल्या पाण्याच्या पट्टया किंवा कापूस ठेवला तर डोळे थंड आणि चांगले राहण्यास मदत होते. शक्यतो मृत्यू नंतर ६ ते ८ तासांमध्ये डोळे काढून झाले पाहिजेत. नेत्रपेढीवर मग पुढे काही दिवस डोळे टिकवून ठेवण्याची सोय असते. त्यांच्याकडे ज्यांना नेत्ररोपणाची गरज आहे अशा रूग्णांची यादी, पत्ता, फोन असतो. त्यांच्याशी संपर्क साधला जातो आणि त्यांगना बोलावून घेतलं जातं. डोळ्यातील फक्त पुढचा पारदर्शक बुबुळाचा भागच (कॉर्निया) नेत्ररोपणासाठी उपयोगात येतो. त्यामुळे ज्यांना बुबुळ खराब झाल्यामुळे अंधत्व आले आहे फक्त त्यांनाच नेत्ररोपणाचा फायदा होऊ शकतो. इतर कारणांनी अंधत्व आले असल्यास नेत्ररोपणाचा फायदा होत नाही. नेत्रदान हे सर्वांनी केले पाहिजे. नेत्रदान केलेल्या डोळ्यांची नेत्रपेढीत तपासणी होते. नेत्ररोपण करण्यासाठी तो डोळा उपयुक्त आहे का नाही ते ठरवले जाते. जर डोळ्यात काही दोष असेल तर तो नेत्ररोपणासाठी वापरला जाऊ शकत नाही. पण असे असले तरी तो डोळा संशोधनासाठी वापरला जातो. म्हणजे त्याचा उपयोग नक्कीच होतो.  

 - डॉ. माधवी मेहेंदळे

   एम.एस. ऑपथोमॉलॉजी (Opthomology)

   विशेष प्राविण्य फॅकोइमल्सिफीकेशन (Phacoemulsification)

   चित्रकार, सामाजिक कार्यकर्त्या  आणि लेखिका 

 

 

2.25
सरासरी 2.3 (4 votes)
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation