Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

गुंतवणूकीचे पर्याय

गुंतवणूक ही फार महत्वाची बाब आहे. जेव्हा आपण गुंतवणूक करतो, तेव्हाच आपल्याला नफा किंवा फायदा होतो. ही गुंतवणूक करताना बाजारातील सर्वसामान्य ज्ञान आणि अभ्यास असणे आवश्यक आहे. गुंतवणुकीचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. सोने, मालमत्ता, म्युच्युअल फंड, शेअर्स, बाँड, इत्यादी ठिकाणी गुंतवणूक आपण करू शकतो.

  • सोने – सोने हे प्रत्येक व्यक्तीची आवडती आणि खात्रीने फायदा देणारी गुंतवणूक आहे. म्हणून बहुतेक लोक सोन्यामध्ये गुंतवणूक करतात. सोन्याला आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी आहे. सोन्याचे मुल्य दिवसेंदिवस वाढत जाते. सोन्याची मागणी वाढत राहिल्यामुळे गुंतवणूकदार सोन्यामध्ये गुंतवणूक मोठया प्रमाणावर करतात.

  • मालमत्ता – जमिनीचे आणि घरांचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. जमीनजुमला, घर आणि मालमत्ता हे विकत घेऊन भाड्याने दिल्यास त्यातून चांगल्या प्रमाणात फायदा होतो. मालमत्ता विकल्यास नफा हा मोठया प्रमाणावर मिळतो. मालमत्तेमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा कल वाढलेला दिसतो.

  • म्युच्युअल फंड – म्युच्युअल फंड विविध कंपन्या बाजारात आणतात. म्युच्युअल फंडामध्ये विविध योजना असतात. या योजनेमध्ये टप्प्याटप्प्याने पैसे गुंतवण्याची सुविधा उपलब्ध असते. हे पैसे विविध कंपन्यामध्ये म्युच्युअल फंडाचे ‘फंड मॅनेजर’ गुंतवतात आणि होणारा नफा ते गुंतवणूकदाराला देतात. म्युच्युअल फंडातील गुंतवणूकीमध्ये जोखीम ही कमी स्वरुपात असते.

  • शेअर्स – शेअर बाजारात विविध कंपन्यांचे मुल्यांकन ठरत असते. विविध कंपन्यांना त्यांच्या प्रगतीवर फायदा होतो. कंपन्यांना झालेला फायदा लाभांश स्वरुपात गुंतवणूकदारांना दिला जातो. दैनंदिन शेअर बाजारात शेअर्सचे व्यवहार होत असतात. शेअर बाजारात गुंतवणूक करणे हे जोखमीचे असते. अनुभव, अभ्यास आणि माहितीच्या जोरावर शेअर बाजारात फायदा हा चांगल्या स्वरुपात होतो.

  • बाँड – सरकारी आणि खाजगी आस्थापने लोकांकडून कर्ज घेते आणि त्याबदल्यात त्यांना बाँड देते. त्यावरील नफा हा मर्यादित स्वरूपाचा असतो आणि कुठलीही जोखीम नसते.अशाप्रकारे गुंतवणुकीचे विविध पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत. या पर्यायांचा माहितीद्वारे अभ्यास करून जास्तीचा नफा कमवून प्रगती साध्य करण्याचा हेतू ठेवला पाहिजे.       

 

- रविंद्र हुन्नुरे 

3.5
सरासरी 3.5 (8 votes)
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation