Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

सोन्यातील गुंतवणूक

सोन्यातील गुंतवणूक

सोने म्हणजे स्त्रियांच्या आकर्षणाचा विषय. सोने प्रत्येक व्यक्तीच्या भावनिक आणि जिव्हाळ्याचा दागिना मानला जातो. भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर लोक सोन्यामध्ये गुंतवणूक करतात.

Ώ सोन्यामधील गुंतवणूकीचे प्रकार  

■ सोनाऱ्याकडून प्रत्यक्ष खरेदी 

■ गोल्ड इ.टी.एफ. (गोल्ड एक्सचेंज ट्रेंडेड फंड)

■ इ गोल्ड  

सोनाऱ्याकडून प्रत्यक्ष खरेदी  

बहुतेक व्यक्ती सोन्याची खरेदी विक्री ही विश्वासू सोनाऱ्याकडून करत असतात. सोन्याच्या या गुंतवणूकीत सोन्याचा दर, वजन, रोख किंवा उधार व्यवहारासाठी सोनाऱ्याच्या विश्वासावर अवलंबून रहावे लागते. दरामध्ये फरक, कमी जास्त वजन,शुद्धतेबाबत साशंकता, सोने सांभाळण्याची जोखीम,इ. प्रश्न असतात. सोन्यातील गुंतवणूक ‘डेड’ गुंतवणूक म्हणून ओळखली जाते. कारण सोन्याचे भाव वाढले म्हणून आपण घरातले सोने  विकत नाही. दागिने केले तर मजुरी, घट हा खर्च वाढतो. सोन्याची खरेदी-विक्री व्यवहार रोखीने (कॅश) केल्याने सरकारचा कर बुडतो. सोन्यामधील गुंतवणूकीचा परतावा घ्यायचा असल्यास सोन्याची नाणी किंवा बिस्किटे विकत घ्यावी, त्यामुळे मजुरीवरचा खर्च वाचतो.

गोल्ड इ.टी.एफ. (गोल्ड एक्सचेंज ट्रेंडेड फंड) 

गोल्ड इ.टी.एफ. प्रकारात सोने खरेदी करणाऱ्या व्यक्तीला एक किंवा अर्ध्या ग्रॅमनूसार सोन्याचे ‘युनिट’ खरेदी करता येतात. सोने खरेदीचे युनिट ‘डीमॅट’ खात्यावर जमा होतात. गोल्ड इ.टी.एफ. डीमॅट होत असल्यामुळे सोने सांभाळण्याची जोखीम राहत नाही.  सोन्याचा बाजारभाव, शुद्धता, वजन, याबद्दल खात्री देता येते. सर्व व्यवहार धनादेशाने (चेक) होत असल्यामुळे व्यवहारात पारदर्शकता राहते. शेअर बाजारात हे युनिटचे व्यवहार होत असल्यामुळे खरेदी-विक्रीत फायदा होतो. खरेदी-विक्रीच्या फायद्यावर कर द्यावा लागतो. गोल्ड इ.टी.एफ. वर संपत्ती कर (Wealth Tax)लागू होत नाही. 

इ गोल्ड 

मार्च २०१० मध्ये इ गोल्ड सुरु झाले आहे. इ गोल्ड डीमॅट स्वरुपात खरेदी करता येते. इ गोल्डमध्ये विक्रेत्याला प्रत्यक्ष सोने मिळू शकते. इ गोल्डवर कर आणि ब्रोकरेज हे गोल्ड इ.टी.एफ. पेक्षा कमी असते. मजुरी देऊन इ गोल्डचे रुपांतर दागिन्यांमध्ये करता येते. नॅशनल स्पॉट एक्स्चेंजवर इ गोल्डचे व्यवहार होतात.इ गोल्डला संपत्ती कर (Wealth Tax) लागू आहे.

तीन प्रकारचे पर्याय सोन्यातील गुंतवणुकीमध्ये उपलब्ध आहेत. गोल्ड इ.टी.एफ. मध्ये सोन्यातील गुंतवणूक फायदेशीर ठरते.

 

- विनित मासावकर
  
vinit.masavkar@pif.org.in

 

 
2.714285
सरासरी 2.7 (7 votes)
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation