Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

या विभागात

फ्लॅट आणि प्लॉटमधील गुंतवणूक

फ्लॅट आणि प्लॉटमधील गुंतवणूक

घर आणि जमिनीच्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहेत. त्या दृष्टिकोनातून बहुतेक लोक फ्लॅट आणि प्लॉटमधील गुंतवणूकीला प्राधान्य देताना दिसत आहेत. ही गुंतवणूक काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे. कारण एक फ्लॅट किंवा प्लॉट तीन आणि चार जणांना विकले जातात, बिल्डरने सांगितलेल्या सुविधा न देणे, इमारतीचे अनधिकृत बांधकाम, इत्यादी फसवणुकीचे प्रकार वाढत चालाले आहेत. म्हणून रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगली पाहिजे. 

निवासासाठी जागेची निवड 

एखाद्या व्यक्तीला राहण्यासाठी घराची निवड कराची असल्यास त्याने सर्वप्रथम बजेटनुसार फ्लॅट घेऊ शकतो किंवा प्लॉट घेऊन बंगला किंवा रो हाउस असे पर्याय आहेत. निवासाच्या ठिकाणापासून कुटुंबातील व्यक्तींचे नोकरी-व्यवसायाचे अंतर, शाळा-कॉलेज, बाजार, रुग्णालय, आदी सुविधा जवळ आणि सुलभ असाव्यात. त्यामुळे प्रवासाचा खर्च आणि वेळ वाचतो. 

फ्लॅट आणि प्लॉटमधील सावध खरेदी करताना सावधानता 

  • विकासकाकडून फ्लॅट आणि प्लॉटमधील संपूर्ण माहिती घ्यावी. आकर्षक जाहिरात आणि माहितीवर अवलंबून राहू नये .
  • विकासकाची बाजारातील पत तपासावी. त्याच्या पूर्वीच्या प्रकल्पांना भेट देऊन तेथील राहणाऱ्या लोकांशी चर्चा करावी.
  • विकासक ज्या जागेवर बांधकाम करणार आहे ती शेत जमीन आहे की बिगर शेतजमीन याची खात्री करून घेतली पाहिजे.  
  • विकासकाने नमूद केलेला दर परिसराच्या बाजारभावाप्रमाणे योग्य आहे का, त्याची तपासणी करावी. 
  • एखाद्या कुटुंबाची गुंतवणूक निवासासाठी असेल, तर त्या घराचा ताबा कधी मिळेल, याची खात्री करून घ्यावी.
  • विकासकाकडून गृहनिर्माण संस्था नोंदणीकृत करून घेणे आवश्यक आहे.
  • विकासकाकडून कनव्हेंस डीड म्हणजे जागा हस्तांतरण करून घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे विकासकाच्या नावाची जागा ही गृहनिर्माण संस्थेच्या नावावर हस्तांतरीत (transfer) होते. 

अशाप्रकारे रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक करताना चौकशी आणि कायदेशीर माहिती घेतल्यास अडचणी येणार नाही आणि गुंतवणूकीचा परतावा चांगला मिळतो.

 

मुलाखत – विज्ञानेश मासावकर
              सचिव : निर्माण प्लाझा सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित 

               

 

- विनित मासावकर

 
  
 

 

4
सरासरी 4 (7 votes)
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation