Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

शेअर बाजार

शेअर बाजार
सौजन्य -www.hindujagruti.org

शेअर बाजार म्हणजे भाग-भांडवली बाजार होय. कंपन्यांच्या समभागांची खरेदी-विक्रीचे व्यवहार येथे होत असतात. गुंतवणूकदारांसाठी धाडसी आणि सक्षम पर्याय म्हणजे शेअर बाजार. भारतीय शेअर बाजारात राष्ट्रीय आणि मुंबई शेअर बाजाराचा समावेश होतो. सेबी : सिक्युरीटी अड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडीयाचे (SEBI: Securities & Exchange Board Of India) शेअर बाजारावर नियंत्रण असते. गुंतवणूकदारांचे हित जपणे आणि गुंतवणूकदारांच्या समस्या सोडवणे. हे सेबीचे उद्दिष्ट आहे. 

शेअर बाजारात गुतवणूक करण्यासाठी डीमॅट अकाऊंट उघडावे लागते. डीमॅट अकाउंट हे बँकेच्या बचत खात्यासारखे असते. डीमॅट अकाउंटमध्ये शेअर जमा होऊन खात्यातून संबंधित शेअरची  रक्कम वजा केली जाते.शेअर बाजारात लहान-मध्यम-दीर्घ स्वरुपात गुंतवणूक आपण करू शकतो. डे-ट्रेडिंगचे व्यवहार सकाळी सुरु होऊन दुपारपर्यंत चालू असतात. शेअर बाजाराचे व्यवहार ऑनलाइनद्वारे केले जातात. शेअर बाजारात गुंतवणूक करताना सर्वसाधारण गोष्टी, तांत्रिक बाबी, कंपन्यांचे आर्थिक व्यवहार, जागतिक स्थितीचा आढावा, आदींचा अभ्यास करणे महत्वाचे आहे. शेअर बाजारात भाग-भांडवल, वस्तू बाजार, म्युच्युअल फंड, आदींचा समावेश असतो. ‘जोखीम जेवढी जास्त तेवढा नफा अधिक‘ हे सूत्र शेअर बाजाराला तंतोतंत लागू  पडते. 

 

- विनित मासावकर
  vinit.masavkar@pif.org.in 

 

4
सरासरी 4 (8 votes)
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation