Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

आधुनिक शेती

आधुनिक शेती म्हणजे अवजारे, खते, बियाणे, उत्पादन, तंत्रज्ञान, आदींमध्ये शेती संदर्भात प्रगती होणे, हे होय. पारंपारिक शेती आणि शेत जमिनीचे विभाजन यामुळे शेतीच्या उत्पादनामध्ये मर्यादा येतात. म्हणून ज्या त्रुटी पारंपारिक शेतीमध्ये आहेत. त्या आधुनिक शेतीमध्ये दूर करण्याचा प्रयत्न चालू आहे.

आधुनिक शेतीमध्ये कंत्राटी पद्धत आणि सेंद्रिय प्रकारची शेती केली जाते. त्यामुळे शेतीचे उत्पादन वाढण्यास मदत होते. वनऔषधी, फळे किंवा फुले यांची शेती, अन्नधान्य आदी वेगवेगळया प्रकारची पिके घेतली पाहिजेत. ज्याने शेतकऱ्याला आर्थिक फायदासुद्धा भरघोस प्रमाणात मिळेल. 

भारतीय शेती ही मान्सूनच्या पावसावर अवलंबून असते. हा मान्सून अनिश्चित असतो. त्यामुळे ‘पाणी अडवा आणि पाणी जिरवा’ ही मोहीम अधिक चांगल्या पद्धतीने राबवायला पाहिजे.  बागायती शेती ही कृत्रिम जलसिंचनाद्वारे केली जाते. आधुनिक शेतीमध्ये जमिनीचा प्रकार आणि मृदेची निवड या महत्त्वाच्या बाबी आहेत. रसायने आणि खते यांचा शास्त्रशुद्ध वापर व्हायला हवा. हरित क्रांती आणि धवल क्रांतीला आधुनिक शेतीची जोड असल्यामुळे कृषि क्षेत्रात अमुलाग्र बदल आपल्याला पहायला मिळतात. म्हणून आधुनिक शेतीचे महत्त्व जाणून योग्य अंमलबजावणी शेतकऱ्यांनी करायला हवी. 

 

-विनित मासावकर

2.625
सरासरी 2.6 (8 votes)
तुमचे रेटिंग

Thanks!

»
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation