Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

Languages

वर्तमान विषय

कृषि संस्था

भारत हा कृषीप्रधान देश आहे.कृषी संस्था ही शेतीमधील महत्वाची गरज आहे. कृषी संस्थांमध्ये शेतीविषयक शिक्षण, शेतीचे संशोधन, वित्तीय नियोजन, शेतकी संघटना यांचा समावेश होतो. शेतीची खते, बियाणे, अवजारे यांचे वेळच्यावेळी व्यवस्थापन होणे गरजेचे आहे. कृषी संस्थेचे शेतकी व्यवस्थापनावर नियंत्रण असणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्या सोडवणे, याला कृषी संस्थेने प्राधान्य दिले पाहिजे.

कृषि शिक्षण | कृषि संशोधन |  वित्तीय सहायता | सरकारी एजन्सीज शेतकी विषयक संघटना  

आधुनिक शेती

पारंपारिक शेतीमध्ये ज्या त्रुटी राहिल्या त्या आधुनिक शेतीने भरून काढल्या. त्यामुळे शेतीमध्ये अनेक अमुलाग्र बदल घडून आले. शेतीचे उत्पादन वाढले, आधुनिक अवजारे, खते, बियाणे, रसायने, शेतीच्या पद्धती या सर्वाचा शेतीला आणि शेतकऱ्याना फायदा झाला. आधुनिक शेती स्वीकारल्यामुळे शेती क्षेत्रात क्रांती घडून आली.

आधुनिक अवजारे आणि तंत्रज्ञान | खते | सेंद्रिय शेती | कंत्राटी पद्धतीची शेती | सिंचन | वनौषधीपशुधन

कृषि विषयक उद्योग

शेतीने रोजगार निर्मितीला मोठ्या प्रमाणात हातभार लावला. कृषि विषयक उद्योगांना त्यामुळे चालना मिळाली. शेतीतून उत्पादन निघाल्यापासून ते ग्राहकाकडे पोहचेपर्यंत विविध प्रक्रिया घडत असतात. शेतीला पूरक असे अन्न प्रक्रिया, दुग्धशाळा, बागायती शेती  कुक्कुटपालन, मत्स्यशेती, शेळीपालन इत्यादी शेतीविषयक सलग्न उद्योग आहेत. कृषी विषयक उद्योगापासून शेतीचे उत्पन्न वाढण्यास हातभार लागतो. कृषिविषयक उद्योगामधून राष्ट्रीय उत्पन्नात भर पडते. 

अन्न प्रक्रिया उद्योग |बागायती शेती रेशीम शेती दुग्धशाळा | मत्स्यशेती |  कुक्कुटपालन | शेळीपालन 

पुरवठा- साखळी

पुरवठा साखळी म्हणजे उत्पादन शेतकऱ्यापासून ते ग्राहकापर्यंत पोहचण्याचा महत्त्वपूर्ण दुवा होय. माल हा बाजारात आल्यानंतर त्याच्या प्रतवारीनुसार उत्पादनाचे मुल्य ठरते आणि नंतर तो माल दलालांमार्फत घाऊक बाजारात जातो. घाऊक बाजारातून तो माल किरकोळ दुकानांमध्ये पोहोचतो. मग आपण ग्राहक तो माल सर्व करांसहित योग्य किंमत देऊन उत्पादन विकत घेतो. अशा प्रकारे पुरवठा साखळी ही उत्पादन बाजारामार्फत ग्राहकांपर्यंत पोहचवते .

अडत्या (दलाल) च्या मध्यस्थीने खरेदी-विक्री गुणवत्ता नियंत्रण | निर्यात | किरकोळ विक्री | साठा आणि वितरण

मुलाखती 

 

© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation
अधिक पहा