Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

परदेशी शिक्षणासाठी द्याव्या लागणाऱ्या प्रवेश परीक्षा

परदेशी शिष्यवृत्ती

परदेशात शिक्षणासाठी काही प्रवेश परीक्षा द्याव्या लागतात. आपण त्याविषयीमाहिती पाहूया.

TOEFEL  ( TEST OF ENGLISH AS A FOREIGN LANGUAGE)

ही इंटरनेट द्वारे घेतली जाणारी चाचणी आहे. ही परीक्षा ETS (EDUCATIONALTESTING SERVICE ) तर्फे घेतली जाते. ह्यातील गुण २ वर्षापर्यंत वैध मानले जातात. ह्या परीक्षेची भारतभर विविध ठिकाणी केंद्रे आहेत.संकेतस्थळ  - www.toefl.org प्रवेश शुल्क  - १६५$ डॉलर ह्या परीक्षेची नोंदणी फोनवर, फेंक्स  मार्फत , स्वतः किंवा ई-मेल वरून करता येते.परीक्षा अर्ज USEFI ( US EDUCATION FOUNDATION IN INDIA) तर्फे मिळतात किंवा संकेतस्थळावरून  घेता येऊ शकतो.

अर्ज भरताना आवश्यक गोष्टी –पारपत्रक(पासपोर्ट) प्रमाणे असलेले नाव, पत्ता, क्रेडीट कार्ड नंबर, कार्ड धारकाचे नाव. एकूण गुण- ३०० यामध्ये वाचन, लिखाण, तोंडी, श्रवण क्षमतांची चाचणी घेतली जाते. 

IELTS (INTERNATIONAL ENGLISH LANGUAGE TESTING SYSTEM) 

IELTS हे BRITISH COUNCIL,IDP: IELTS AUSTRALIA & UNIVERSITY OF CAMBRIDGE,ESOL EXAMINATION  ह्यांच्या एकत्रित मालकीचे आहे.संकेतस्थळ  - www.britishcouncil.ऑर्ग ह्या परीक्षेचे गुण २ वर्षांपर्यंत वैध धरले जातात. परीक्षेची नोंदणी स्वतः अथवा ई-मेल  मार्फत केली जाते. नोंदणीसाठी आवश्यक गोष्टी- पासपोर्ट प्रमाणे नाव, पत्ता, २ अलीकडे काढलेले फोटो, डिमांड ड्राफ्ट. IELTS ही लेखी स्वरुपाची परीक्षा आहे. वेळ- ३ तास  गुण - ९ पैकी ही परीक्षा वाचन.लेखन, श्रवण,बोलणे ह्या स्वरुपात घेतली जाते. ऑस्टेलिया, केनडा, न्यूझीलंड, यू.के., यू.एस. इथे  शिकण्यासाठी  हीं परीक्षा द्यावी लागते.

GRE ( GRADUATE RECORD EXAMINATION) 

ही परीक्षा पदव्युत्तर पदवीसाठी घेतली जाते.   ETS( EDUCATIONAL TESTING SERVICE ) तर्फे ही परीक्षा घेतली जाते. संकेतस्थळ  - www.gre.com ह्या परीक्षेचे गुण ५ वर्षापर्यंत वैध मानले जातात. नोंदणी ई-मेलवर, फोनवर, फेक्स मार्फत  केली जाते.  ऑनलाइन  रेगिस्त्रतिओन हे  ' my GRE account '  ह्या ets संकेतस्थळावर केले जाते.

SAT ( SCHOLASTIC APTITUDE TEST) 

महाविद्यालयीन मंडळातर्फे प्रवेश दिला जातो.हीं परीक्षा यू.एस.ए.(USA) व केनडा CANADA  इथल्या पदवीसाठी आवश्यक आहे. संकेतस्थळ  -www.collegeboard.com नोंदणी ई-मेलमार्फत केली जाते. अर्ज USEFI( US EDUCATION FOUNDATION IN INDIA) तर्फे मिळतात. नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे-  पासपोर्ट प्रमाणे नाव, पत्ता,क्रेडीट कार्ड नंबर. ह्या परीक्षेला गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, लेखन, साहित्य,भाषा, अमेरिकेचा इतिहास, जगाचा इतिहास असे विषय असतात.

 

- श्रेया अयाचित 

 

 

4.5
सरासरी 4.5 (2 votes)
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation