Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

शैक्षणिक कर्ज

शैक्षणिक कर्ज

समाजामध्ये अशा अनेक व्यक्ती असतात ज्यांना शिक्षण घेण्याची इच्छा असते पण घराच्या आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेण्यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. अशा व्यक्तींसाठी बँकेद्वारे देण्यात येणारे शैक्षणिक कर्ज हा उत्तम पर्याय आहे. आजकाल बहुतेक सगळ्याच बँकांकडून शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून दिले जाते.एकदा आपण कुठल्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणार आहोत हे निश्चित झाले की, मग विविध बँकांच्या विविध शैक्षणिक कर्जाचा विचार करावा. बँकांच्या शैक्षणिक कर्जाच्या कसोट्या प्रत्येक अभ्यासक्रमानुसार निरनिराळ्या असतात. जसे की, इंजिनिअरिंग ,मेडीकल, इ. शिक्षणासाठी कर्ज देतांना बँका जास्त रकमेचे कर्ज लगेच मान्य करतात.

याउलट कला किंवा वाणिज्य शाखांच्या अभ्यासक्रमासाठी कर्ज देतांना बँक सर्व शक्यता पडताळून कर्ज मंजूर करते. याचे मुख्य कारण म्हणजे कर्जाची परतफेड. म्हणजेच  बँकांना त्यांचे मुद्दल आणि व्याज लवकरात लवकर परत करणे ज्या अभ्यासक्रमासाठी शक्य असते. त्या अभ्यासक्रमासाठी  मोठ्या रकमेची कर्ज ही ब्यांक लगेच मंजूर करतात. मेडीकल, इंजिनिअरिंग किंवा यासारख्या अभ्यासक्रमांमध्ये उत्पन्नाचे साधन लगेच निर्माण होत असल्यामुळे कर्ज फेडण्यास त्यांना विलंब लागत नाही. तरीही सर्व शक्यता पडताळल्यानंतर बँकेला जर एखादा अभ्यासक्रम योग्य वाटला, तर त्यासाठी त्वरीत कर्ज मंजूर केले जाते.

शैक्षणिक कर्ज हे देशांतर्गत शिक्षण आणि देशाबाहेरील म्हणजेच परदेशी शिक्षण या दोन्हीसाठी उपलब्ध होऊ शकते. बँकेतर्फे हे कर्ज पदवी घेण्यासाठी, पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी तसेच पदवीनंतरचे व्यावसायिक किंवा तत्सम शिक्षण घेण्यासाठी उपलब्ध होऊ शकते.एकदा आपला अभ्यासक्रम निश्चित झाला की, संबंधित बँकेकडे चौकशी करून आपण ते मिळवू शकता.

 

- अनघा पाटील

 

2.6
सरासरी 2.6 (5 votes)
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation