Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

कॉर्पोरेट गव्हर्नन्सची आवश्यकता

जागतिकीकरण आणि आर्थिक उदारीकरणानंतर जगभरातील अनेक मोठमोठ्या कंपन्यांनी भारतामध्ये बस्तान बसवलं. त्यानंतर, भारतातील मोठमोठ्या कंपन्यांनीही झपाट्याने कात टाकली. साहजिकच परदेशी कंपन्यांप्रमाणेच कॉर्पोरेट गव्हर्नन्स ही संकल्पना भारतात रुजली. त्याचे फायदे लक्षात येऊ लागले. अमेरिकेतील मोठय़ा कंपन्यांच्या पतनानंतरकॉर्पोरेट गव्हर्नन्स जागतिक स्तरावर चर्चेचा विषय झाला. कॉर्पोरेटगव्हर्नन्सच्या अभावामुळे आर्थिक संकट उभे राहू शकते आणि परिणामतः त्यासाठीआर्थिक व सामाजिक किंमत मोजावी लागते, हे लक्षात येऊ लागले. त्यामुळे राष्ट्र विकासापासून अनेक वर्षेमागे पडत असल्यामुळेच कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि त्यातही कॉर्पोरेट ऑडिटला विशेष महत्त्व प्राप्त झाले. 

कॉर्पोरेट जगतातील अलीकडच्या गैरव्यवहारांमुळे प्रमाणक आणि मानक जगभरात अस्तित्वात आली आहेत. भारताततही सिक्युरिटीज अॅळण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) या विषयांचा अभ्यास करण्यासाठी कुमारमंगलम बिर्ला (२०००) व नारायण मूर्ती (२००३)यांच्या अध्यक्षतेखाली दोन वेगळ्या

समित्या नेमल्या. सेबीच्या या दोनसमित्यांच्या शिफारसी भारतातील कॉर्पोरेट गव्हर्नन्समधील बदलास सर्वाधिक कारणीभूत ठरल्या. भारतातील मोठय़ा कंपन्यांच्या व्यवस्थापकांच्या कार्यावर अनॅलिस्ट व स्टॉक मार्केटचाखूपच मोठा प्रभाव आहे. त्यामुळे, त्या जोखडातून त्यांना बाहेर काढून कॉर्पोरेट गव्हर्नन्सच्या संदर्भात कंपनीच्या विचारधारेनुसार भागधारकांना मूल्यवर्धन करून देणे, हे लक्ष ठेवावे लागेल. विकसित जागतिक वातावरणात होणा-या बदलांशी जुळवून घेण्यासाठी आणि नव्यानव्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी गव्हर्नन्समध्ये सातत्याने बदल करणे क्रमप्राप्त आहे. 

प्रत्येक कंपनीत कॉर्पोरेट गव्हर्नन्स नीट राबवलं जात आहे किंवा नाही, हे पाहण्यासाठी सेबीच्या धर्तीवर एक मध्यवर्ती व्यवस्था निर्माण होण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे. देशाची अर्थव्यवस्था सक्षम असेल तर देशाला विकसित देशांच्या बरोबरीनं बसण्याचं भाग्य लाभतं. पायाभूत सुविधांचा विकास झाला, तर मोठमोठ्या नागरी प्रकल्पांची आव्हानं सहज पार करता येऊ शकतात. त्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला आणि औद्योगिक क्षेत्राला निश्चितच होतो. त्यामुळेच, कॉर्पोरेट गव्हर्नन्स खंबीर आणि कार्यक्षम असेल, तर त्यावर प्रगतीची मोहोर नक्कीच उमटविता येईल.

 

- मनीषा भावे

0
No votes yet
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation