Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

सिस्टमॅटीक इनवेस्टमेंट प्लान (एस. आय. पी.)

 सिस्टमॅटीक इनवेस्टमेंट प्लान

म्युच्यूअल फंडमधील सिस्टमॅटीक इनवेस्टमेंट प्लान (एस. आय. पी.) सुविधेअंतर्गत एखादा गुंतवणूकदार ठराविक रक्कम नियमित कालावधीसाठी गुंतवितो. जसे महिना, तिमाही, सहामाही, वार्षिक. यामुळे किंमत कमी असताना एखाद्या कंपनीचे जास्त युनिट खरेदी होते तर किंमत जास्त असताना कमी युनिटची खरेदी होते.काही काळानंतर सरासरी मुल्यानूसार योजनेतील युनिटची खरेदी झाल्याचे समजते.

सिस्टमॅटीक इनवेस्टमेंट प्लानच्या (एस. आय. पी.) विषयी ठळक बाबी...


१. ज्याप्रमाणे आपण पोस्टात, बँकेत रिकरिंग खाते उघडतो, त्याप्रमाणे एस आय पी योजना मुच्यूअल फंडातील रिकरिंग म्हणू शकतो.

२. एस. आय. पी.मध्ये दर ठराविक काळाने निवडलेल्या ठराविक एस. आय. पी. योजनेत ठराविक रक्कम भरावीच लागते . त्यासाठी सुरवात करताना पहिला चेक ठराविक रकमेचा द्यावा लागतो .त्यानंतरचे पुढील हप्ते ई सी एसने  (ECS) बँक खात्यातून मुच्यूअल फंडाच्या योजनेत जमा होतात.

३. एस. आय. पी.योजनेत कमीत कमी रु. ५०० पासून गुंतवणूक करता येते.

४. एस. आय. पी.त ज्या दिवशी रक्कम जमा होते, त्या दिवशीच्या नेट अॅसेट वॅल्युनूसार (एन.ए.व्ही.)युनिटस् मिळतात. 

    उदाहरणार्थ,  २० जानेवारी २०१३ या दिवशी कोटक मुच्यूअल फंडाची एनएव्ही रु.२३०.५०असेल,  तर ५००० रकमेकरिता २१.६९ युनिट्स जमा होतात . अशाच प्रकारे दर ठरविलेल्या तारखेला एनएव्हीनुसार कमी किंवा जास्त युनिट्स जमा होतात .

५. एस. आय. पी.त हप्ता भरल्यानंतर जर १ वर्षाच्या आत रक्कम काढल्यास त्यावर १ टक्के एक्झिट लोट कापला जातो. एक्झिट लोट म्हणजे निर्गमन भार होय.  

६.एस. आय. पी. त दीर्घकाळासाठी गुंतवणूक केल्यास बाजारभावाची सरासरी धरली जाऊन चांगला परतावा मिळू शकतो 

७. एस. आय. पी.त रुपी कॉस्ट एवरेजमुळे कमी किमतीला जास्त युनिट मिळतात . 

८. आपल्या म्युच्यूअल फंडच्या विभागणीनुसार (अॅसेट अलोकेशन) भागभांडवल ठराविक मर्यादेपर्यंत (इक्विटी- लार्ज कॅप), कर्जरोखे आणि भागभांडवल यांची विभागणी (बलन्सफंड), विविध क्षेत्रांची विभागणी उदा. बँक, पायाभूत सुविधा, इ. (सेक्टर कॅप), भागभांडवल ठराविक मूल्याच्या  मर्यादेपर्यंत (फंड मिड कॅप), सरकारी कर्जरोखे, बॉंड, आदी. (फंड डेट फंड) मध्ये गुंतवणूक करता येते.

९. काही म्युच्यूअल फंड कंपनी टॉप अप एस. आय. पी. ची योजना आहेत . यानुसार दर सहा महिने किंवा वर्षानंतर एस. आय. पी.च्या रकमेत वाढ करण्याची सूचना पहिल्या एस.   आय. पी.च्या हफ्त्याबरोबर द्यायची असते. यामुळे उत्पन्न वाढते. तसे आपण गुंतवणुकीत वाढ करू शकतो.

१०.एस.आय. पी.त काही मुच्यूअल कंपन्या आयुर्विम्याचे संरक्षण देतात.त्यासाठी वेगळा खर्च द्यावा लागत नाही.

     उदा. बिर्ला मुच्यूअल फंडची सेंच्युरी सिप योजना. ही योजना तिसऱ्या वर्षानंतर एस. आय. पी.च्या मासिक रकमेच्या १०० पट विमा संरक्षण देते . 

११. एस. आय. पी. लवकर सुरु केल्यास अधिक फायद्याचे ठरते. उशिरा सुरु केल्यास तुलनेने कमी फायदा होतो किंवा खूप जास्त रक्कम गुंतवावी लागते. चक्रवाढ गतीचा फायदा   घेण्यासाठी कमी रक्कम जास्त काळ गुंतवली जाणे फायद्याचे असते.  

१२. शेअर बाजार कोसळत असताना एस. आय. पी.त गुंतवणूक करणे फायद्याचे ठरू शकते. 

१३. मार्केट कसे आहे मार्केटवर जागतिक परिस्थितीचा काय परिणाम होईल याकडे दुर्लक्ष करून दीर्घ मुदतीसाठी पाच वर्षापेक्षा जास्त एस. आय. पी.त गुंतवणूक करून जास्तीत जास्त संपत्ती निर्माण करावी.


- विद्या गोरे

 
3
सरासरी 3 (2 votes)
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation