Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

शेअर बाजारात काम करण्याच्या पद्धती

शेअर बाजारातून उत्पन्न मिळविण्याचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. यात प्रमुख दोन पर्याय १) डे-ट्रेडिंग व अल्पकालीन ट्रेडिंग २.) दीर्घकालीन गुंतवणूक आहेत.  या क्षेत्रात येण्यापूर्वी आपल्याला कोणता मार्ग निवडायचा आहे या विषयी तुमच्या मनात सुस्पष्ट कल्पना असणे जरुरीचे आहे. बहुतेक या क्षेत्रात येणा-या नवीन गुंतवणूकदारांचा कल पहिला पर्याय स्वीकारण्याकडे जास्त असतो. 

कमी गुंतवणूक करून जास्तीत जास्त नफा मिळावा असा हेतू अनेक नवीन गुंतवणूकदारांचा असतो आणि त्याच ठिकाणी फसगत होण्याची जास्त शक्यता असते. अनुभव असा सांगतो की आपली गुंतवणूक जेवढी दीर्घकालीन असेल तितकी नफ्याची शक्यता वाढते. शेअर बाजारासंबंधी त्यातील शेअरच्या किमतीच्या चढउतारांसंबधी आपण जेवढा जास्त अभ्यास करू तितका आपल्याला फायदेशीर ठरतो. त्यामुळे शेअर बाजारात भांडवलाबरोबरच शिक्षण, संयमही तितकाच आवश्यक आहे. हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. 

 

- प्रवीण धोपट

4.11111
सरासरी 4.1 (9 votes)
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation